तरुणांना स्वतःच्या हिमतीवर उद्योजक बनवून औद्योगिक क्रांती करणार- समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

तरुणांना स्वतःच्या हिमतीवर उद्योजक बनवून औद्योगिक क्रांती करणार- समाधान आवताडे

     
                                                         मंगळवेढा(प्रतिनिधी ) आश्वासनावर विश्वास ठेवून आजपर्यंत आपण मतदान करीत आला आहात. परंतु मागील चुका  काढत बसण्यापेक्षा पुढे चुका होवू नयेत, येणारा काळ तरी चांगला असावा याचा विचार करून मतदान करा या मतदारसंघामध्ये आतापर्यंत औद्योगीक क्रांती होवून युवकांचे प्रश्न सुटायला हवे होते.  परंतु तसे झाले नाही त्यामुळे आजचा युवक हा दिशाहीन झालेला आहे. तुमच्या कष्टाला राजकीय ताकदीचे बळ मिळाले असते तर तुमची प्रगती पाच पटीने वाढली असती पण असे झाले नाही झाले गेले विसरून आता विचार करून मला साथ द्या या मतदारसंघातील तरुणांना स्वतःच्या हिमतीवर उद्योजक करून तालुक्यात औद्योगिक क्रांती करणार असल्याचे प्रतिपादन उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी प्रचार सभेदरम्यान बोलताना केले ते काल रविवार दि. १२ रोजी डोणज, नंदूर, बालाजीनगर, कात्राळ, कर्जाळ, कागष्ट,डिकसळ, येड्राव, खवे, जित्ती, बावची मरवडे आदि गावांमध्ये सदरच्या प्रचार दोर्यादारम्यान बोलत होते.


पुढे बोलताना आवताडे म्हणाले की इतर मतदारसंघातील विकासकामे बघा आणि आपल्या मतदारसंघातील विकासकामे बघा. जमीन अस्मानाचा फरक आहे. सोलापूर शहराला पिण्याचे पाणी सोडण्यासाठी भिमा नदीला पाणी आल्यावर आपल्याला पाणी मिळते. तेच जर उजनी ते सोलापूर पाईपलाईनचे काम मार्गी लागल्यानंतर पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर बनणार आहे.राजकारण्याकडून फक्त राजकारणच झाले आहे हा मतदारसंघ दुर्लक्षीत भाग ओळखला जात आहे. मला कोणावर टिका-टिपण्णी करायची नाही परंतु हे विदारक वास्तव आहे. जनतेला कागदावरचा विकास नको आहे, एक पिढी गेली , दुसरीही चालली निदान येणारी पिढी तर वाया जावू नये याची काळजी आणि खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. तुमच्या अडचणीविषयी अर्ध्या रात्रीलासुध्दा हाक द्या मी कायम तुमच्यासोबत उभा असेन. अशी ग्वाही आवताडे यांनी  देत त्यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

सदर प्रचार सभेमध्ये बोलताना दत्तात्रय जमदाडे सर म्हणाले, तरुणांच्या हाताला काम कोण देवू शकेल, शेतक-यांचे भलं कोण करु शकेल हा शोध स्व।मारवाडी वकील साहेबांनंतर पासून अजूनही सुरु आहे. एका घरात एक आमदार असताना दुसरा अजून आमदार त्यांना हवा आहे. पण वय कुणालाही माफ करीत नसते. सिमेवर छाताडावर गोळ्या झेलणा-या, मातृभूमीचे रक्षण करणा-या सैनिकांच्या पत्नीबध्द्ल अनुद्गार काढणा-यांना कधीच माफी दिली जाऊ शकत नाही. राज्यपालांचं पत्र फडकावलं, जनतेला वाटलं पाणी आलं. टोकन मंजूर झालं म्हणून आरोळ्या ठोकल्या, जनतेला वाटले पाणी आलं. आश्वासनाचं राजकारण बंद करुन आता समाधान आवताडे यांच्या रुपाने परिवर्तन घडवून आणूया असे शेवटी जमदाडे सर म्हणाले

यावेळी दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, पप्पू काकेकर, विजय माने, प्रा.समाधान क्षिरसागर,राजेंद्र कट्टीमनी, दयानंद आनंदपुरे, अमोल माने, चाँद मुलाणी, प्रशांत ढावरे आदीनीही मनोगत व्यक्त केले. या प्रचार सभांप्रसंगी दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील,शिवयोग्याप्पा पुजारी, अशोक केदार, माजी उपसभापती शिवाजी पटाप, मार्केट कमेटी संचालक चंद्रकांत गोडसे ,परमेश्वर येणपे, चनबसू येणपे, आझाद दारुवाले, धन्यकुमार पाटील, रामचंद्र माने,हिराण्णा नरुटे, सचिन पटेल, भारत माने, नंदकुमार जाधव, सुरेश इंगोले, लालासो मुलाणी, आनंदा कित्तूरकर, विकास दुधाळ, मारुती भोसले, गजेंद्र साळुंखे, प्रशांत ढावरे, बबन नागणे, दादासाहेब शिंदे, बसवेश्वर कित्तूरकर,शिवाजी [बटू]पवार,दत्तात्रय गायकवाड,हरीभाऊ जाधव, आण्णासो पवार, दिगंबर मासाळ, दत्तात्रय बनसोडे, सुनिल जाधव,विठठल चौधरी, भारत पाटील, हरीभाऊ सपताळ,शाम पवार,अजीत मोहिते यांचेसह संबंधीत गावांतील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन,सदस्य, मान्यवर, समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रचार सभांना उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.

चौकटीत घेणे--

 सदर प्रचार सभांमध्ये प्रहार शेतकरी संघटणेचे महेश बंदाई,रामदास पवार तसेच अपंग संघटणेचे उत्तम सरडे, रावसाहेब बिले यांनी समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला व समाधान आवताडे यांच्या गटात प्रवेश केला. समाधान आवताडे यांना पाठींबा देण्याचा ओघ अजूनही वाढतच आहे.

test banner