यंदाच्या दिवाळीत तमाम महिलांनी मताच्या रूपाने सुधाकर पंताना भाऊबीज भेट देऊया -चित्रा वाघ महिला मेळाव्यात महिलांचा मोठा प्रतिसाद - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

यंदाच्या दिवाळीत तमाम महिलांनी मताच्या रूपाने सुधाकर पंताना भाऊबीज भेट देऊया -चित्रा वाघ महिला मेळाव्यात महिलांचा मोठा प्रतिसाद

             
                                                       मंगळवेढा(प्रतिनिधी) मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिलांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. या माध्यमातून देशातील महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन आले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत भाजप- सेना प्रणित महायुतीला तमाम महिलांच्या वतीने मताच्या रूपाने भाऊबीज भेट देऊ असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा तथा भाजपाच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी शहा होत्या.

252 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष   व शिवसेना प्रणित महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. हा मेळावा मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

पुढे बोलताना वाघ म्हणाल्या की,ज्या व्यक्तिमत्वाने आयुष्यभर मतदार संघाच्या विकासाची कास धरून आपली वाटचाल केली त्या सुधाकरपंत परिचारकांच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या राजकीय डोंगरापुढे पाच-दहा वर्षाचे वारुळं काय करू शकणार असे त्या बोलल्या.

यावेळी खासदार जयसिध्देश्वर महाराज, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,कोमल ढोबळे,वैशाली सातपुते,सिमाताई परिचारक आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी रतनचंद शहा बॅकेचे चेअरमन राहूल शहा,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,अविनाश
 कोळी यांच्यासह सिमाताई परिचारक, कोमलताई ढोबळे,माजी जि.प.उपाध्यक्ष वैशाली सातपुते, जि.प.
बालकल्याण समिती सभापती रजणीताई देशमुख,शितल बुरकूल,ज्योती चव्हाण,निर्मला माने,राजश्री भोसले,रेणुका साळुंखे, शुभांगी सूर्यवंशी,सविता स्वामी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा अंजलीताई  भिमराव मोरे यांनी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.

पुढे बोलताना वाघ म्हणाल्या की, महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले उज्वला गॅस योजना महिलांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून तासन्तास चुलीपुढे बसून स्वयंपाक करण्याचा महिलांचा त्रास कमी झाला आहे. यातून महिलांचे आरोग्या बरोबरच स्वयंपाकाला जाणारा वेळ वाचल्याने महिलावर्ग उर्वरित वेळामध्ये लहान-मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून अर्थार्जन करू लागल्या आहेत.तिहेरी तलाक सारख्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी केंद्र शासनाने कायदा केल्याने मुस्लिम महिलांना सुरक्षा लाभली आहे असेही त्या म्हणाल्या. महिलांचे प्रश्‍न राजकारणापलीकडे असतात हे सोडवण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचेही शेवटी चित्रा वाघ यांनी सांगितलं. यावेळी महिलांची गर्दी लक्षणीय होती.

 प्रस्ताविक अजीत जगताप, सुत्रसंचालन प्रा.स्वाती कौंडूभैरी यांनी तर आभार शशिकांत चव्हाण यांनी मानले.
test banner