हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले यांच्या शिवाय पर्याय नाही-कट्टर शिवसैनिक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले यांच्या शिवाय पर्याय नाही-कट्टर शिवसैनिक

     
                                                                हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले  यांच्या शिवाय पर्याय नाही असे शिवसैनिक करत आहेत.                          विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे महत्त्व कमी करण्याच्या नादात दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांनी स्वतःचे व शिवसेनेचे अस्थितव कमी करण्यातच धन्यता मानत गेले .
नवी मुंबईत शिवसेना पक्षाच्या उभारणीसाठी जी   मेहनत त्यांनी घेतली,त्यांचा थोडा देखील विचार कुणी केला नाही,स्वतःचा भावाचा बळी गेला तरी ते डगमगले नाही ,विरोधकांना अंगावर घेऊन धडाडीने शिवसेना पक्ष बांधणी करू लागले.विजय चौगुले न घाबरता नेटाने पक्षाची बांधणी केली व महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १७ नगरसेवक निवडुन आणले ते शिवासेना नेते संजय राऊत, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पण नवी मुंबईतील संकुचित शिवसेना नेत्यांना या गोष्टी पचल्या नाहीत त्यांनी त्यांचा खेळ सुरु केला प्रत्येक वेळेला विजय चौगुले यांना कसे डावलता येईल याकडे लक्ष केंद्रित केले व तशा बातम्या वरिष्ठांच्या कानावर टाकुन ते मातोश्री ,सेनाभवन येते नेहमी गाराणी मांडली गेली.  याचाच परिणाम विजय चौगुले  यांना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला.या सर्व प्रकारच्या गोष्टी लक्षात घेऊन विजय चौगुले यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील आपला वडार समाज एकत्र करून मोठी ताकद उभी केली व सोलापुर जिल्ह्यात सिद्धरामेश्वर च्या पावन नगरीत इतिहासात नोंद असा समाजाचा मेळावा घेतला त्या मेळ्याव्यास स्वतः  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशध्याक्ष चंद्रकांत दादा पाटील,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,खा. राजन विचारे,सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नेते या मेळाव्याचे साक्षीदार होते.एवढा मोठा समाज पाहुन मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतंत्र वडार समाजासाठी एक समिती नेमून त्यास राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्या समितीचे अध्यक्ष म्हणून विजय चौगुले यांची नियुक्ती केले. हा आहे त्यांचा सन्मान पण नवी मुंबईतील नेत्यांना त्यांची ताकद कळलीच नाही विजय चौगले मास लिडर आहेत. पक्षाला नेहमीच फायदा होईल याचा विचार कुणी केलाच नाही. नव्या मुबईतील नेत्यांनी तर कहरच केला त्यांचा फोटोच बँनेरवर न लावण्याचा निर्णय घेतला, कांही लोकांनी ते अमलात देखील आणले .
बेलापूर ते दिघा म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका परिसर म्हणजे नवी मुंबई जिल्हा प्रमुख याचे दोन भाग करून बेलापूर व ऐरोली असे दोन जिल्हा प्रमुख तयार केले गेले. एक विठ्ठल मोरे बेलापूर विधानसभा दुसरे द्वारकानाथ भोईर ऐरोली विधानसभा या सगळ्यांचे बॉस विजय नाहटा ,जे काय करायचे ते नाहटा यांना विचारूनच करायचे
   नाहटानी तर काय केले विजय चौगुलेंनी तयार केलेले बेलापूर विभागातील  कार्यकर्ते घेऊनच संघटना बांधण्यास सुरवात केली पण पुर्णपणे विजय चौगुले यांना डावलुनच त्यात त्यांचा स्वार्थ होताच की त्यांना  सेनेकडुन आमदारकी ची तिकीट मिळावी बस या पलिकडे कांहीच नाही,ते उपनेते नव्या मुंबईचे बेलापूर व ऐरोली विधानसभा या दोनी मतदारसंघात लक्ष केंद्रित केले पाहिजे होते.पण नाही त्यांनी  स्वतः पुरते मर्यादित अंथरूण पांघरूण पाहिले त्यांना संघटनेशी काय घेणे देणे, उपनेते म्हणुन संपुर्ण नव्या मुंबईत लक्ष घालायला पाहिजे होते ते त्यांनी का नाही केले.शिवसेना उपनेते म्हणुन ऐरोली मतदारसंघात त्यांचे वैयक्तिक पातळीवर काम शुन्य आहे,आज निवडणुकीच्या तोंडावर चार सहा महिने कांही सामाजिक उपक्रम राबविले व थोड्याफार प्रमाणात कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले ,मातोश्री ,सेनाभवन मधील नेत्यांच्या संपर्कात राहिले म्हणजे झाले. आपण निवडुन येणार ही भावना त्यांनी उराशी बाळगली आहे .फक्त नेरुळ, बेलापुर, सी बी  डी या पलिकडे काय  वाशी, करावा, धारावा, दिवाळे, तुर्भे ,सानपाडा, त्यात विजय चौगुले यांना ही मानणारी लोक बेलापुर मध्ये आहेत, याचा त्यांना विसर पडला आहे. राजकारणात हा नको तो नको ही भुमिका घेऊन जाणे म्हणजे विनाशकली विपरीत बुध्दी आज काय परस्थिती पक्षात नेते,पदाधिकारी,भरपुर पण कोणी कोणाला विचारात घेत नाही मान सन्मान  नाही. प्रत्येक पावला पावलांवर पदाधिकारी झाले. व्यासपीठावरील खुर्च्या जास्त व कार्यकर्ते कमी झाले.
    ऐरोली मतदारसंघात विजय चौगुले यांना प्रतिस्पर्धी कोणी यांनीच तयार केले,जे विजय चौगुले निवडुन येण्याचे शंभर टक्के दावेदार आहेत ,ते निवडणुकीच्या संदर्भात मौन बाळगतात  ज्यांना माहीत आहे आपण विधानसभा निवडणुक जिंकु शकत नाही ते मात्र उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग. त्या इच्छुक उमेदवारांना देखील माहीत आहे की, खरे दावेदार विजय चौगुलेच आहेत, कारण दांडगा जनसंपर्क, मासलिडर,भरपुर खर्चकरण्याची दानत,सर्व जाती धर्मातील लोकांशी हित संबंध,कार्यकर्त्यांची मोठी फौज,विरोधकांना मध्ये त्यांच्या नावाची असणारी दहशत ,वैयक्तिक असणारे व्यक्तिमत्त्व ,विजय चौगुले नावाचे असणारे वलय,जनतेची सध्याची असणारी मागणी.तरीसुद्धा विनाकारण विरोधाला विरोध  या सर्व कारणांमुळे विजय चौगुले यांनी मौन बाळगले आहे.ते वेट अँड वॉच या भूमिकेत असून त्यांनी नव्या मुंबईतील इतर शिवसेना नेत्याना पदाधिकारी ,कार्यकर्ते ,महिला आघाडी यांना संघटना बांधण्याची एक प्रकारे संधीच दिली आहे ते कुणाच्या कार्यक्रमात ढवळाढवळ ही करत नाहीत कुणी बोलवलं तर कार्यक्रमाला जतात बँनरवर फोटो टाका नका टाकु काहीच बोलत नाही,कुणालाही संघटनेचे कार्यक्रम आयोजित करण्यास रोखले नाही ,मग पुर्वी सारखे कार्यक्रम का होत नाही , पक्षासाठी कुणी पुढे होऊन खर्च करत नाही. पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश सगळ्यांना बंधनकारक आहे  मान्य
पक्षश्रेठी देतील तो उमेदवार विजय चौगुले ऎवजी दुसरा उमेदवार दिला तर शिवेसनेचा पराभाव निश्चितच म्हणजेच काय शिवसेना 10 वर्षे मागे जाणार नक्की.
या सर्व गोष्टीचा संघटनेला तर नुकसान आहेच .पण इथल्या सर्व कार्यकर्त्यांची परस्थिती म्हणजे कुत्रे हाल खात नाही ,त्यांना कुणीच विचारत नाही ,फक्त नशिबी ससेहोलपट जवळ जवळ अस्थितव संपल्यात जमा त्यांनी कुणा कडे बघायचे ,त्यांना कुणाचा आधार ,मग ज्याला मार्ग मिळेल त्या मार्गाने जातात त्यांना कोण मार्गदर्शन करणार
सध्या बीजेपी मध्ये मेघा भरती सुरू आहे जर उद्या ऐरोली, व बेलापूर ची सीट बीजेपी ला गेली तर बंड करून उमेदवारी लढवण्याची धमक दाखवुन अन्याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस  एकात तर आहे का ?कारण हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या भाषणात सतत ठामपणे सांगितले अन्याय होत असेल न्याय मिळत नसेल तर गधारी करण्या पेक्ष्या बंड करून न्याय मिळावा . अस तुकाराम काते जे सध्या आमदार आहेत त्यांनी केले होते धाडस
जे इच्छुक आहे ते करतील का हे धाडस.की गुपचुप पक्ष श्रेष्ठींनी दिलेला आदेश स्थिरस्तावर मानुन
एकेकाळच्या विरोधकांचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरतील .
तेंव्हा कुठे जाईल एकमेकांचा  विरोध एकमताने,एकसंघाने राहिले असते तर हक्काची सीट सोडण्याची वेळ आली नसती ,ही नामुसकी पत्कारावी लागली नसती .थोडक्यात काय एकातएक नाही बापात लेक नाही
   बेलापुर ऐरोली या दोनी जागा मागण्यांसाठी 10 दिवसांनी आचारसंहिता जाहीर होण्याची वेळ आली तेंव्हा मोजकया लोकांची बैठक घेऊन सर्व नगरसेवक राजीनामा देणार असा पक्ष श्रेष्ठीवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करता ,निर्णय घेता  शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार ,काय सर्व नगरसेवक म्हणजे संपुर्ण नवी मुंबई शिवसेना असे गृहीत धरले आहे का ?शिवसैनिकांना एखादा मेळावा घेऊन विचार विनिमय करावा असे वाटले नाही ,शिवसैनिक काय फक्त झेंडे पथाके ,लावणे बँनेर लावणे घोषणा देणे शिवसैनिकांची किंमत काय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझा शिवसैनिक माझा प्राण आहे ,माझ्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे,संघटनेत सगळ्यात मोठे शिवसैनक पण सध्याच्या काळात त्यांची परिस्थिती न घर का ना घाट का  नवीन पदाधिकारी झालेत यांना त्याचे काय सोयर सुतक नाही
ज्या विजय चौगुले साहेबांकडे  कार्यकर्ते ,शिवसैनिक आशेने बघत होते त्यांची अवस्था नवी मुंबईतील नेत्यांनी अशी करून ठेवली त्यांना कुठेच लक्ष घालु देत नाही पदाधिकारी निवडताना, विचारात घेतले नाही, कुठेच लक्ष घालु दिले नाही .त्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर डावळण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक वेळेला राजकारण,तक्रार काय करावं त्या माणसांनी तरी आपलेच होट आपलेच दात असे झाले आहे.  विज चौगुले वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष  (राज्यमंत्री) झाल्यापासुन तर त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोनच नवी मुंबई नेत्यांचा बदलला त्यामुळे त्यांनी स्वतःचा योगेवेळी योग्य निर्णय घेतील. त्याला सर्वस्वी जबाबदार नवी मुंबईतील नेते आहेत. पण शिवसैनिकांना विश्वास आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख चे स्वप्न साकार करण्यासाठी आदरणीय उध्दव साहेब जो निर्णय घेतील ते मान्य करतील
आत्ता सर्व सामान्य कार्यकर्ते ,शिवसैनिक यांना विजय चौगुले शिवाय दुसरा कुणी वाली नाही.
test banner