देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी परिचारकांना निवडून द्या : खा.डॉ.जयसिद्धेश्वर महाराज - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी परिचारकांना निवडून द्या : खा.डॉ.जयसिद्धेश्वर महाराज


मंगळवेढा (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी सुधाकरपंत परिचारक यांना विजय करून आपल्या  मतदारसंघात विकासाची गंगा आणुया असे आवाहन खा.डॉ.जयसिद्धेश्वर महाराज यांनी केले आहे ते सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ तामदर्डी,तांडोर,सिद्धापूर,बोराळे, नंदुर,डोणज,अरळी येथे बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील,दिनकर मोरे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण,वामनराव माने, दाजी पाटील,युन्नूस शेख,माजी सभापती शिवानंद पाटील,रयतक्रांती प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले,माजी जि.प सदस्य बापुराया चौगुले, जालिंदर व्हनुटगी,अण्णासो नांगरे पाटील,अप्पासाहेब पाटील,डॉ.आर.के.तोरवी,राजेंद्र लाड,गजानन चौगुले,रमेश कोळी,बाबासो बिराजदार आदीजन उपस्थित होते.

खा.जयसिध्देश्वर महाराज पुढे बोलताना म्हणाले की,परिचारक यांनी अनेक विकासाची कामे केली असून कोणताही आरोप नसलेले असे व्यक्तिमत्त्व आहे.भाजप पक्षाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी येत्या २१ तारखेला सुधाकरपंत परिचारक यांना विजय करून आपला मतदारसंघात विकासाची गंगा अनुया असे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री ढोबळे म्हणाले की,परतीच्या पावसाने शेतकऱ्याच सोन केलं आहे.मतदारसंघाच्या विकासाची दृष्टी असलेला नेता निवडून दिला पाहिजे.चरित्र संपन्न माणूस असलेले सुधाकरपंत परिचारक व्यक्तिमत्त्व आहेत.रस्ते, वीज पाणी भीमा नदीवरील बॅरेजेस बंधारा आदि विकास येणाऱ्या काही महिन्यात होणार आहे.वचनपूर्ती करणारा नेता.बसवेश्वर महाराजांचे स्मारकासाठी कटिबद्ध आहे.

ज्यांनी कारखाना काढला त्यांच्याच कारखाना बळकावला असून विठ्ठल कारखान्यात ४० कोटीचा दरोडा टाकला.४०० कोटी पर्यंत कारखाना कर्जात नेला.शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर दिले नाहीत.जुना गडी बदलण्याची हीच खरी वेळ आले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शशिकांत चव्हाण,दीपक भोसले,शिवानंद पाटील, दिनकर मोरे यांनी मनोगत व्यक्त केली व सुधाकरपंत परिचारक यांना विजय करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे तर आभार विकास सोनगे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा