माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे

       
         
           मंगळवेढा(प्रतिनिधी) माझी उमेदवारी ही कोणत्या पक्षाची नाही तर माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे मी मतदारसंघाचा विकास करायचा हे ध्येय घेऊन जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवित आहे ज्या जनतेने मला निवडणूक लढविण्याचे बळ दिले आहे ती जनता मला निवडूनही आणणार आहे तरी सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते ढवळस, धर्मगांव, मुढवी, उचेठाण, बठाण, अरळी, बोराळे येथे आयोजीत केलेल्या प्रचार सभांमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना आवताडे म्हणाले की , आजपर्यंत या मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे. परंतु हे वास्तव आहे. आजपर्यंत विकास हा शब्द प्रत्येक वेळी कानाने आपण ऐकत आलो आहोत परंतु विकास खरोखर काय असतो हे मला जनतेला दाखवून द्यायचे आहे. नदीकाठावरची गावे असूनही या गावांच्या अडचणी आहेत. उजनी धरण स्थापण होवून इतकी वर्षे झाली. आपल्या हक्काचे पाणी कोठे गेले, कसे गेले, ही जबाबदारी कोणाची होती याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली नदीकाठाला पाण्याची पाळी वाढत होती. परंतु उजनी ते सोलापूर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्ते प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अनेक प्रश्नांनी या मतदारसंघातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. समस्यांचा पाढा वाढतच आहे. हे सर्व बदलण्यासाठी एक वेळ संधी द्या. विकास कामे करण्यात मी कमी पडलो तर पुढच्या निवडणूकीमध्ये मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.
सदर प्रसंगी दत्तात्रय जमदाडे सर म्हणाले, कोणत्या उमेदवाराच्या वयाबध्दल मी टिका टिपण्णी करणार नाही , कारण प्रत्येकाला या वार्धक्यातून जावेच लागणार आहे. परंतु या अशा वयामध्ये असे उमेदवार जनतेची कामे कशी करणार आहेत हा मतदारांनाच पडलेला प्रश्न आहे. सिमेवर रक्त सांडणा-या जवानांच्या पत्नीबध्दल अवमानकारक भाष्य करणा-यांना म्हणजेच त्यांच्या कुठुंबातील सदस्याला उमेदवारी मिळतेच कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. जवानांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला अशा उमेदवाराला राजकारणातूनच तुम्ही उध्वस्त करा असे प्रतिपादन केले.
या प्रचार सभांमध्ये शिवसेनेचे नेते प्रा.येताळा भगत सर, प्रा.समाधान क्षिरसागर,शेतकरी संघटणेचे सिध्देश्वर हेंबाडे,मारुती गायकवाड, भागवत बेदरे, बाळासो घोडके,बाबासो बावचे,सुभाष चौगुले तसेच इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दामाजी कारखान्याच्या संचालिका स्मिता म्हमाणे,चंद्रकांत गरंडे, औदुंबर मोरे, शिवाजी हेंबाडे,दत्तात्रय हेंबाडे,पंपू मोरे,आण्णासाहेब टकले, पांडूरंग माने,गंगाराम माने,अनिल माने,सुरेश टकले,अविनाश कुचेकर,बिभीषण बेदरे,सुभाषभाऊ बेदरे,विकास बेदरे, दादासो बेदरे, संजय बेदरे, राजाभाऊ बाबर,रावसाहेब राजमाने, रविंद्र कुंभार, शिवाजी मोहिते, पैगंबर  इनामदार, कासाय्या स्वामी, शिवाजी सरसंबी, सुभाष मोहिते, गणेश गांवकरे, भिमाशंकर कवचाळे, कामण्णा बनसोडे, तानाजी जाधव, अशोक पाटील, तानाजी जाधव, बसाण्णा पाटील, चनवीर लंगोटे, डॉ.रत्नाकर बनसोडे, राजकुमार स्वामी, अक्षय पवार आदिसह संबंधीत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन,सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर ठिकाणी सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.

test banner