जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार!एक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार!एक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे


                                                          मंगळवेढा(प्रतिनिधी )पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी (आमदार) म्हणून स्वीकारण्याची  मनाची तयारी केली होती परंतु पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्याचा मध्ये मी कमी पडले विधानसभेसाठी पहिल्यांदा इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून पक्ष विरोधामध्ये बंडखोरी करणे संयुक्तिक वाटत नाही म्हणून जनतेच्या आग्रहा खातर अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज जनतेची माफी मागून काढून घेत आहे. एका बाजूला जनतेचा आग्रह आणि दुसऱ्या बाजूला पक्ष विरोधामध्ये बंडखोरी असा कठीण प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाल्याने नेमका काय निर्णय घ्यावा.
 पक्षामध्ये सक्रिय काम केल्यानंतर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल अशी माझ्यासह जनतेला सुद्धा अपेक्षा होती परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली किंवा उमेदवारी मिळवण्यासाठीच मी पक्षात काम करीत होते असा चुकीचा समज जनतेमध्ये आणि सहकार्‍यांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.
 मंगळवेढा भागातील 35 गावाचा पाण्याचा प्रश्न, म्हैसाळ योजनेचा पाण्याचा प्रश्न, उजनीच्या कालव्यावरील पाण्याचा प्रश्न, भीमा नदीच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न, नीरा भाटगर च्या पाण्याचा प्रश्न, एम आय डी सी चा प्रश्न, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या रोजगाराचा प्रश्न, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा पेक्षा पक्षांमध्ये राहूनच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून आवाज उठवून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणे आजच्या व भविष्यातील राजकीय स्थितीचा विचार करता हे जनतेच्या हिताचे आहे असे माझे मत झाले आहे. मला उमेदवारी देण्यामध्ये पक्षाला अडचणी आल्या असतील किंवा उमेदवारी मिळवण्यामध्ये मी कमी पडले असेल परंतु भविष्य काळामध्ये असा प्रसंग येणार नाही आणि जर असा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला तर त्यावेळी मात्र पक्षाचा आदेश पाळणे माझ्यावर बंधनकारक राहणार नाही. आज रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षातील किंवा इतरांचा कोणाचाही दबाव माझ्यावर आलेला नाही. तसेच मी कोणत्याही आमीषाला बळी पडलेली नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीला प्रथमच पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. आणि लगेचच बंडखोरी करणे उचित वाटत नाही माझ्यासमोर उभे राहिलेली परिस्थिती आणि वास्तव विचारात घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेने एकवेळ मला माफ करावे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी खचून जाणार नाही "करून दाखविले करत राहणार"  या ब्रीद वाक्याप्रमाणे यापुढेही जनतेच्या प्रश्नाला शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम व जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार आहे.
test banner