मंगळवेढा प्रतीनिधी : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी काही उमेदवारांना
कोणतीच राजकीय दिशा सापडेनाशी झालेली असताना. आ. भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ
युवा नेतृत्त्व मा. भगीरथदादा भालके फ्रंटफुट
वर आल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
त्यांनी जिल्हापरिषद गटानुसार प्रत्येक गावातील
पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना
निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले. भालके गटात युवक कार्यकर्त्यांची नव्याने बांधणी
करण्याचे जोरदार काम सध्या करत आहेत.
आ.भारतनानांनी मतदार संघात केलेली विकासकामे जास्तीत
जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. पारंपरिक
पद्धतीसोबत तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक प्रक्रियेत करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
विरोधी पक्षाचे नेते
तिकीट आणि पक्ष या चिंतेत असताना भगीरथदादा बूथ निहाय मोर्चे बांधणीत आघाडी घेत
आहेत. त्यातच त्यांना मिळणारा युवकांचा वाढता पाठींबा विरोधी उमेदवारासाठी डोकेदुखी
ठरू शकतो. परंतु भगीरथदादा फ्रंटफुट वर खेळत असल्यामुळे भालके गटात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.