कासेगावच्या सरपंचपदी उज्वला धोत्रे यांची बिनविरोध निवड 17 पैकी 12 सदस्य परिचारक गटाचे असून सरपंच पदापासून वंचित - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

कासेगावच्या सरपंचपदी उज्वला धोत्रे यांची बिनविरोध निवड 17 पैकी 12 सदस्य परिचारक गटाचे असून सरपंच पदापासून वंचितपंढरपूर  ( प्रतिनिधी ) पंढरपुर तालुक्यातील कासेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच पदी उज्वला बाबुशा धोञे याची बिन विरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून कासेगावचे मंडल अधिकारी मोरे  व तलाठी जाधव  तसेच विस्तार अधिकारी नेरळे  यांनी काम पाहिले ,निवडणुकीची प्रक्रियाची वेळ  साडेबारा पर्यंत ठेवण्यात आली होती. यावेळेत फक्त उज्वला बाबुशा धोञे याचा एकमेव अर्ज आल्यामुळे यानां बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले,यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते .निवडीनंतर सरपंच यांची गावातुन वाजवत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलालाची व फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली होती.यावेळी सरपंच उज्वला धोञे यांचे हार पुष्प गुच्छ देऊन सर्व मान्यवर व नागरिकांनी स्वागत केले.तसेच ग्रामपंचायत लिपिक संतोष भोसले तानाजी कापसे,रेखा जाधव, जयसिग जाधव भाऊसो जाधव, विकास वाघमारे,आमोल गायकवाड़ याच्याही हस्ते सरपंच सौ उज्वला ताई धोञे यांचा सत्कार करण्यात आला. 
दरम्यान पंचायतीत एकूण सतरा सदस्यांची संख्या असताना त्यामध्ये पांडूरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंत नाना देशमुख यांचेकडे 8 सदस्य व कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेख यांचेकडे 4 असे दोन्ही मिळून 12 सदस्य परिचारक गटाकडे असताना देखिल परिचारक गटाचा सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्यामुळे कासेगावात एकच चर्चेला उधाण आले आहे. जि.प. सदस्य, पं.स. सदस्य आणि कारखान्याचे संचालक असे परिचारक गटाचे तीन तगडे कार्यकर्ते असताना देखिल परिचारक गटाचा सरपंच होऊ शकला नाही. या मागे काय राजकारण असू शकते याची परिचारकांनी पडताळणी करणे गरजेचे आहे. कारण भालके गटाचे पाच ग्रा. सदस्य असताना भालके गटाचा सरपंच होतोय. मग बघा आता तुम्हीच मालक !
test banner