सरकोलीच्या शेखर भोसले यांची रेल्वे विभागात कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती स्वेरीतून घेतली सिव्हील इंजिनिरिंगची पदवी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

सरकोलीच्या शेखर भोसले यांची रेल्वे विभागात कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती स्वेरीतून घेतली सिव्हील इंजिनिरिंगची पदवी


                                                          

 पंढरपूर(प्रतिनिधी)गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटसंचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हील इंजिनिरिंग) मधून सन २०१२ साली पदवी झालेले शेखर पांडुरंग भोसले (सरकोली,ता.पंढरपूर) यांची महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महा रेल येथे कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.
            स्वेरीमधून अभियांत्रिकीतील सिव्हील इंजिनिअरिंग या विभागातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ७ वर्षे अशोका बिल्डकॉनएल अँड टीपुणे,मेट्रो जनरल कन्सल्टंट सारख्या नामवंत खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना चांगल्या हुद्यावरील नोकरी मिळावी याकरीता आपला अभ्यास सुरूच ठेवला. त्यांच्याकडे रेल मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र राज्य यांच्याशी सलग्न असलेले रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम सोपविण्यात आले आहे. सध्या त्यांची नियुक्ती लोणावळा येथे करण्यात आली आहे. शेखर भोसले यांनी यशाचे श्रेय आपले आई वडीलसर्व मार्गदर्शक आणि विशेषतः स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे,शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार आणि सिव्हील इंजिनिरिंगच्या सर्व प्राध्यापकांना दिले आहे. रोंगे सरांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वेरीतील वसतिगृहात असताना अभ्यासासाठी असणारा प्राध्यापकांचा पाठपुरावा,पंढरपूर पॅटर्न’ च्या माध्यमातून झालेले आभ्यास, कडक शिस्त याबरोबरच अभ्यासाचा सराव करण्याची लागलेली सवय या सर्व बाबींचा अभ्यास करताना खूप फायदा झाल्याची प्रतिक्रिया शेखर भोसले यांनी दिली. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्धल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेअध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडास्वेरीचे पदाधिकारी,विश्वस्तस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य,अधिष्ठाताविभागप्रमुख,प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

test banner