कन्याकुमारी सायकल यात्रा यशस्वी करणाऱ्या सायकलस्वारांचे मंगळवेढेकरांकडून जल्लोषात स्वागत व सत्कार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६

कन्याकुमारी सायकल यात्रा यशस्वी करणाऱ्या सायकलस्वारांचे मंगळवेढेकरांकडून जल्लोषात स्वागत व सत्कार


मंगळवेढा : वारी परिवार सायकल क्लब, मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळवेढा ते कन्याकुमारी व्यसनमुक्ती जनजागृती सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून मंगळवेढ्यात परतलेल्या सायकलस्वारांचे मंगळवेढा शहरात मंगळवेढेकरांच्या वतीने  उत्साहात स्वागत करण्यात आले.


देशभक्तीपर वातावरणात शहरातून सायकलस्वारांची रॅली काढण्यात आली शिवतीर्थावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या सुरवातीस 26/11 मधील हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


 व्यसनमुक्तीसाठी अतिशय खडतर सायकल प्रवास करून आलेल्या प्रा.महेश अलिगावे,सागर लंगोटे,नागेश डोंगरे,शरद हेंबाडे,प्रफुल्ल सोमदळे,दत्ता जाधव,विठ्ठल बिले,राहुल सावंजी,डॉ राहुल शेजाळ,भारत नागणे,दिलीप आडसूळ,फारुख मुजावर,प्रा.विनायक कलुबर्मे आदी सायकल पटटुंचा नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे,उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत,मनोहर कलुबर्मे,शशिकांत चव्हाण,सिमाताई बुरजे,जयदीप रत्नपारखी,डॉ सचिन बेलदार,सोमनाथ आवताडे,रमेश जोशी,मेजर मल्लय्या स्वामी,प्रशांत चव्हाण,संजय डांगे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन मंगळवेढेकरांच्या वतीने गौरविण्यात आले.


यावेळी रायडर्सनी सायकल प्रवासातील आलेले अनुभव आणि अनेक आठवणी सांगितल्या यावेळी सुनंदा आवताडे,सिमाताई बुरजे आणि रमेश जोशी यांनी वारी परिवाराने व्यसनमुक्तीचा हाती घेतलेला विषय आजच्या काळात खूपच महत्वाचा असून सर्वांनीच त्यामध्ये सहभाग नोंदवून आपलं गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी पुढे आले पाहिजे असे सांगून वारी परिवाराच्या कार्याचे खूप कौतुक केले.


व्यसनमुक्त समाजाचा संदेश घेऊन महाराष्ट्र,कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतून तब्बल १३५३ किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करत सायकलस्वारांनी कन्याकुमारी गाठली होती ही यात्रा केवळ सायकल प्रवास नसून समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करणारी एक लोकचळवळ ठरली आहे.


या प्रवासादरम्यान विविध गावांमध्ये व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली ना व्यसन करणार, ना करू देणार,व्यसनमुक्त समाज घडवणार हा संदेश सायकलस्वारांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवला या मोहिमेचे यश समस्त मंगळवेढेकरांना समर्पित करण्यात आले असून, यात्रेदरम्यान शुभेच्छा, सदिच्छा आणि सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


मंगळवेढ्याच्या इतिहासात सामाजिक जनजागृतीचा नवा अध्याय लिहिणाऱ्या या सायकल यात्रेने ‘एक पाऊल व्यसनमुक्तीकडे’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.


यावेळी शिवाजी वाकडे,शिवाजी सोमदळे,राजेंद्र सुरवसे सतिश हजारे,सोमनाथ हुशारे,बाबा कोंडूभैरी,राजाभाऊ चेळेकर,पिंटू माने,अरुण गुंगे,गणेश धोत्रे, सोमनाथ माळी,सिद्धेश्वर अवघडे,परमेश्वर पाटील,संजय माळी,समाधान डोंगरे,सचिन नागणे,विलास आवताडे,नारायण गोवे,प्रा धनाजी गवळी,अविनाश चेळेकर,नंदकुमार नागणे,चंद्रकांत काकडे,अजय आदाटे,दत्तात्रय भुसे,मदन पाटील,संतोष मोगले,सिद्धाप्पा शिंदे यांचेसह कल्पतरु परिवार,मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटनेतील पदाधिकारी,वारी परिवार,मंगळवेढेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

test banner