दीपावलीनिमित्त संतभूमी मंगळवेढ्यात दामाजी पुतळा परिसरात वारी परिवाराच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व दीपोत्सव. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२६

दीपावलीनिमित्त संतभूमी मंगळवेढ्यात दामाजी पुतळा परिसरात वारी परिवाराच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व दीपोत्सव.


मंगळवेढा:- 

दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त संतभूमी मंगळवेढा येथे वारी परिवाराच्या वतीने श्री संत दामाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.


या उपक्रमामुळे दामाजी पुतळा परिसर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला. विद्युत रोषणाई आणि दीपांच्या प्रकाशामुळे परिसरात प्रसन्न, भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.


मंगळवेढ्याची संतपरंपरा, संस्कृती आणि धार्मिक वारसा जपण्याच्या उद्देशाने वारी परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 


दीपोत्सवाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना एकत्र आणत दीपावलीचा आनंद आणि प्रकाशाचा संदेश देण्यात आला.


वारी परिवाराच्या या सुंदर उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून,संतभूमी मंगळवेढ्याच्या सांस्कृतिक वैभवात या दीपोत्सवामुळे आणखी एक सुंदर भर पडली आहे.


यावेळी वारी परिवाराचे स्वप्निल टेकाळे,विजय जोशी,सागर राऊत,प्रफुल्ल सोमदळे,रतिलाल दत्तू,विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू,कृष्णा दत्तू,निखिल दत्तू,शिवतेज कलुबर्मे,पृथ्वीराज कलुबर्मे,राजवीर दत्तू,रणवीर दत्तु,शाहू दत्तू,देवराज दत्तू उपस्थित होते.

test banner