मंगळवेढा:-
रेणुका महिला भजनी मंडळ यांच्या वतीने एक दिवस गावासाठी मोहिमेअंतर्गत संत दामाजी पुतळा परिसराची शनिवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत स्वच्छता करण्यात आली.
श्री संत दामाजी पुतळा चौकात आहे व वाहतूक जास्त असल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ करून पाण्याने पुतळा स्वच्छ करून परिसरात रांगोळी काढण्यात आली.
सदर परीसरात वाढदिवसानिमित्त झाडांच्या कुंड्या भेट देऊन सुशोभीकरण करण्यात येत आहे. मंगळवेढे भूमी संतांची असून शहरातील प्रत्येक संतांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे.
मंगळवेढ्यात दर शनिवार व रविवार राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी सहभाग नोंदवावा व स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढा करण्यासाठी प्रयत्न करावा.यासाठी समस्त मंगळवेढकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले.मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी येल्लूताई सलगरे,रजनी होनमाने,शोभा वाकळे,पल्लवी उगाडे,रिना मासाळ,वंदना कलुबर्मे,मीना इंगळे,प्रतिभा पाटील,लता भोरकडे,संगीता मोरे,सविता कोळेकर,सुवर्णा पंडित,प्रियांका माळी,शुभदा उघडे,वर्षा शिवशरण,रंजना होनमाने,भाग्यश्री सलगरे यांनी सहभाग नोंदवला.
