प्रतीनिधी :
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा . स्मिता पाटील मॅडम व शिक्षणाधिकारी मा . कादर शेख साहेब यांच्याशी निवेदन देऊन खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
➡️संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नये कारण समायोजन करणे हे प्रशासनाचे काम आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल, कोणत्याही शिक्षकांचे वेतन थांबणार नाही असे साहेबांनी सांगितले.
➡️केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी.-कोर्टाकडे मार्गदर्शन मागवलेले आहे त्यानुसार मार्गदर्शन आल्यानंतर लवकरच प्रक्रिया राबविण्यात येईल असे साहेबांनी सांगितले.
➡️मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी.
➡️विषय शिक्षकांना (भाषा - विज्ञान - समाजशास्त्र) नियमाप्रमाणे वेतन करणे लागू करण्यात यावी.
➡️वैद्यकीय देयकांसाठी निधीची तरतूद करून लवकर वैद्यकीय बीले शिक्षकांना अदा करावीत.
➡️ फंड प्रकरणांना होणारा विलंब टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
➡️पात्र प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्यात यावा.
➡️जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील "आदर्श - शिक्षक" पुरस्कार वितरण कार्यक्रम हे विहित वेळेत पार पडावेत .
वरील सर्व विषयाबाबत शिक्षणाधिकारी व Dy. CEO मॅडम सकारात्मक असून लवकरच वरील सर्व विषयांची अंमलबजावणी करण्या संदर्भात महोदयांनी सकारात्मकता दर्शवली,यावेळी शिक्षक संघाचे राज्य -नपा/ मनपाचे - सरचिटणीस संजय चेळेकर,जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार,शिक्षक नेते शेखर शेख- शामराव पाटील,जगन्नाथ म्हेत्रे, दत्तात्रय भोसले, द. सोलापूरचे कार्याध्यक्ष अनिल म्हेत्रे, सुहास जाधव, सचिन मोरे, सुधीर बनसोडे व राजू राठोड उपस्थित होते.