मंगळवेढा:-
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मंगळवेढा येथील डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार वारी परिवारास प्रदान करण्यात आला.
दिनांक १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ आमदार समाधान आवताडे व प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते वारी परिवारास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अनेक तरुणांना एकत्र करून प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूर जाणाऱ्या वारी परिवाराचे सामाजिक कार्य सातत्याने सुरु असुन आपण आपल्या गावासाठी काही तरी करावे या भावनेतून दारू नको दूध प्या,वृक्षरोपण,माणुसकीची भिंत,मतदान जनजागृती सायकल रॅली,मारणोत्तर नेत्रदान,व्यसमुक्ती,सार्वजनिक शौचालायाची स्वच्छता,शैक्षणिक साहित्य वाटप,बेघर झालेल्या अनाथांना ब्लॅकेट वाटप,स्मशानभूमीतील महिलेचा सन्मान करून,महिला दिन,गाय दान अशी अनेक समाजपयोगी कामे करून वारी परिवाराने सामाजिक कार्याचा ठसा उमटवीला आहे.
सदर पुरस्काराप्रसंगी अजय आदाटे,शशिकांत चव्हाण,अजित जगताप,परमेश्वर पाटील,दत्तात्रय घोडके,कविराज दत्तू,दत्तात्रय भोसले,स्वप्निल फुगारे,नाना चेळेकर,सागर राऊत आदी वारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.