वृक्ष लागवड व संवर्धनासाठी वारी परिवार सायकल क्लबची मंगळवेढा ते गुड्डापूर जनजागृती सायकल राईड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १४ जून, २०२५

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी वारी परिवार सायकल क्लबची मंगळवेढा ते गुड्डापूर जनजागृती सायकल राईड.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मंगळवेढा ते गुड्डापूर ता.जत जि.सांगली जनजागृती सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे.


सदर राईडचे सकाळी 6 वाजता दामाजी मंदिररापासून प्रस्थान झाले.यावेळी खोमनाळ,भाळवणी,निंबोणी बावची,चिक्कलगी,मारोळी,जाठर बोबलाद,लकडेवाडी,माडग्याळ या गावांमध्ये रॅली काढून वृक्ष संवर्धन व लागवड संदर्भातील पत्रके वाटून प्रबोधन करण्यात आले.


सध्या पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे सदर मार्गावरील गावांनी पुढाकार घेऊन लोक सहभागातून आपापल्या गावात झाडे लावावीत तसेच लावलेली झाडे जपावीत,वृक्ष लागवड व संवर्धन ही एक चळवळ बनावी यासाठी प्रबोधन केले.


मंगळवेढा ते गुड्डापूर जाता येता 110 किलोमीटरचा प्रवास सायकल वरती करून वारी परिवाराने हाती घेतलेले पर्यावरण पूरक कार्य खरोखरचं कौतुकास्पद आहे.


सदर राईडमध्ये अवीनाश जाधव,प्रा.महेश अलिगावे,चंद्रजीत शहा,भारत नागणे,प्रफुल्ल सोमदळे,सिद्धेश्वर डोंगरे,प्रमोद महामुनी,विनायक कलुबर्मे,पवन कापसे,रविराज जाधव,रोहन सूर्यवंशी या राईडरने सहभाग नोंदवला राईडसाठी हुकूम मुलानी,नितीन पाटील,शिरीष पाटिल यांचे विशेष सहकार्य मिळाले यावेळी सचिन इंगळे,हनुमंत ढेंबरे,नानासाहेब मोरे,नामदेव चौगुले,दत्तात्रय साखरे,चारुदत्त पाटील,दामाजी माने,सतीश दत्तू उपस्थित होते.


test banner