मंगळवेढा:-
छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आजच्या युगात तरुणांना आदर्शवत आहे असे मत उद्योजक संजय आवताडे यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती सुवर्ण महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त बोलत होते.
सुरवातीस मूर्तीची प्रतिष्ठापना संजय आवताडे यांच्या हस्ते व रामचंद्र वाकडे,दत्तात्रय जमदाडे,प्रा.येताळा भगत,शशिकांत चव्हाण,सिद्धेश्वर आवताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी शिवालयातून निघालेल्या भगव्या पदयात्रेतून संभाजी महाराज की जय,हर हर महादेव अशा घोषनांनी परिसर दुमदुमून निघाला.
यावेळी आवताडे म्हणाले शंभूराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमान ठेवून स्वराज्यासाठी केलेले बलिदान कायम स्मरणात राहणारे आहे.एकही लढाई न हरणारा जगाच्या पाठीवर असणारा एकमेव राजा म्हणून संभाजी महाराज ओळखले जातात असे सांगून संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी सर्व आजी-माजी अध्यक्ष,सार्वजनिक शिवजयंती सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व सदस्य,शिवशंभू भक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन माजी अध्यक्ष प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.