भारतीय नारी ही उपजतच सबला असून नेतृत्व ,व्यवस्थापक, शूरता ,धाडशी ,काटकसरी आदी बलस्थाने असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा येथिल प्रतिथयश डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी केले.
लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर अंतर्गत मंगळवेढा शाखेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा 'नारीशक्ती पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवती जिल्हा सरचिटणीस अँड सुमय्या लतिफ तांबोळी या होत्या. प्रारंभी स्त्री शिक्षणाची गंगोत्री सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी युवती जिल्हा सरचिटणीस अँड सुमय्या तांबोळी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना शिक्षक नेते संजय चेळेकर म्हणाले की, माजी मंत्री व आमदार मा. सुभाषवापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकमंगल समुहाने महाराष्ट्रभर सहकाराचे जाळे विणले आहे. लोकमंगल संस्थांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर रोजगार निमिर्ती झाली असून नवीन व्यवसायिक व उद्योजक निर्माण झाले आहेत .लोकमंगल बँकेमुळे मंगळवेढा तालुक्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. याप्रसंगी त्यांनी लोकमंगल बँकेच्या प्रगतीचा व सामाजिक कार्याचा गौरव केला.
बँकेचे अधिकारी श्री शिवाजी दरेकर यांनी सर्वाचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी न . पा . कन्या शाळा नं .१ मंगळवेढयाची इयत्ता दुसरीची विद्यार्थ्यांनी कु .शरयू अतुल सावंजी हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मनं जिंकली.
या प्रसंगी अँड . राणी माने, गोरिमा शेख मॅडम , नंदूरच्या सरपंच सुमनताई गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यकमाचे अध्यक्ष निवड संभाजी ताानगावडे व अनुमोदन उमेश काळे यांनी केले . कार्यकमाचे सुत्रसंचालन श्री शिवाजी दरेकर यांनी तर आभार प्रदर्शन शाखाधिकारी श्री सचिन पलंगे यांनी केले.
यावेळी यशेधा पतसंस्थेच्या चेअरमन निलाताई आटकळे. डॉ. पुष्पांजली शिंदे , नंदुरच्या सरपंच सुमनताई गोडसे, आदर्श माता वंदना भगरे अॅड राणी माने, मंडल अधिकारी विद्या शिंदे ,सहशिक्षिका गोरिमा शेख, सहशिक्षिका लता मलगोंडे, पोलिस पाटील वर्षाराणी माळी, गमसेविका संगीता लेंडवे, आरोग्यसेविका राणी बुरांडे, महिला पोलिस रूपाली दौंडे, बालवाडी शिक्षिका पुजा ढोणे, अंगणवादी मदतनीस सिंधुताई डोरले व सफाई कामगार हौसाबाई अवघडे यांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास बँकच्या संचालिका सौ उज्वला संजय चेळेकर उपस्थित होत्या . कार्यकम यशस्वी करण्यासाठी सचिन पलंगे, संतोष वावचे ,उमेश काळे ,रमेश दत्तु ,स्वप्नील पाटील, राहुल जगताप, सुनिता शिंदे, धनश्री कोंडुभैरी ,सुहास शिंदे व विशाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.