वारी परिवाराने सायकल वरती जाऊन 65 एकर पालखी तळावरती केले वृक्षारोपण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २४ मार्च, २०२५

वारी परिवाराने सायकल वरती जाऊन 65 एकर पालखी तळावरती केले वृक्षारोपण.


मंगळवेढा:-

विचार स्वच्छ हवामानाचा,विचार पर्यावरण रक्षणाचा या उद्दिष्टाने दि 23 मार्च जागतिक हवामान दिनानिमित्त मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने रविवारी मंगळवेढा ते पंढरपूर सायकल वरती जाऊन पंढरपूर येथील 65 एकर पालखी तळावरती वृक्षारोपण करण्यात आले.


आज सिमेंटची वाढती जंगले आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे तसेच औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांची कमतरता आहे तर दुसरीकडे हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे अशा स्थितीत पृथ्वीवरील वाढते तापमान वेळीच रोखण्यासाठी झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे हे ओळखून हरित वारी पालखी महामार्गाचे संकल्पक हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारी परिवार सायकल क्लब मधील प्रत्येक सदस्यांच्या हस्ते पालखी तळावर वड,पिपंळ देशी वृक्ष लावण्यात आले.


सदर उपक्रमात 501 झाडे लावून त्याचे संवर्धन देखील केले जाणार असून नजीकच्या काळात वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांना झाडाची गार सावली व स्वच्छ प्राणवायू मिळण्यास मदत होणार आहे.


यावेळी शिवाजी महाराज मोरे यांनी वृक्ष लागवड ही चळवळ होऊन तरुणांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे असे सांगून वारी परिवार सायकल क्लबचे आभार मानले.


यावेळी कृतियुक्त सायकल रॅली मध्ये विजय क्षीरसागर,कल्याण घुले,जयंत पवार,राजेंद्र नलवडे,नंदकुमार नागणे,चंद्रजीत शहा,ओम लुगडे,योगीराज ठेंगील,स्वप्निल टेकाळे,सिद्धेश्वर डोंगरे,प्रफुल्ल सोमदळे,पांडुरंग कोंडूभैरी,यश महामुनी,पवन टेकाळे,गणेश मोरे,विजय जठार,अरुण गुंगे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी जण सहभागी होते.


यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती,नगरपरिषद पंढरपूर,वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर,वृक्षदाई संस्था देहू आदी संस्थेचे विश्वस्त,अधिकारी,वृक्षप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.


test banner