मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवमुर्तीस शिवम योगा क्लासच्या विदयार्थ्यांकडून विविध योग असानातून चित्तथरारक प्रात्यक्षिकातून शिवरायांना वंदन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.उल्हास माने यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष ॲड.विष्णुपंत बेदरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी ॲड.विक्रमसिहं मासाळ,ॲड.धनंजय हजारे,ॲड.राजू शेख,ॲड.सागर टाकणे,ॲड.महादेव गायकवाड,ॲड.बापूसाहेब मेटकरी,सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे,हर्षद डोरले आदी मान्यवर उपस्थित होते.
पीळदार शरीर व शरीरिक लवचिकता ठेवून योगासनातूनच जीवनात आनंदी राहून उत्तम आरोग्य व निरोगी राहता येते यासाठी शिवम योगा क्लासचे विद्यार्थी व मार्गदर्शक योग शिक्षक चेतन महामुनी यांनी वेगवेगळ्या आसनांची प्रत्यक्षिके शिवगितातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सदर योगडेमोतून सर्वेश स्वामी,जय सावंजी,भावना पवार,राजनंदिनी जाधव,शंभू सावंजी,भरत चौधरी,श्रेयश वाकडे,मानसी स्वामी,गायत्री सावंजी,आरुषी माळी आराध्या कलुबर्मे,शिवन्या कलुबर्मे,ज्ञानेश्वरी स्वामी,पृथ्वीराज चव्हाण,प्रिया मुदगुल,बाबू धोत्रे,समर्थ गवळी,आयुष धोत्रे आदी विद्यार्थी व योगशिक्षक चेतन महामुनी यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी अध्यक्ष प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.