मंगळवेढा:-
मंगळवेढा शहरात मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली, समाज कार्यात नेहमी अग्रेसर राहून विविध सामाजिक उपक्रमातून व कार्यातून आपली छाप पडून वेगळी ओळख निर्माण करणारी संस्था म्हणजे मंगळवेढा नगरी चे माजी उपनगराध्यक्ष श्री.चंद्रकांत घुले यांची जगदंब सामाजिक बहुउद्देश्यीय संस्था आणि त्यांचा जगदंब परिवार,मंगळवेढा.
या संस्थेमध्ये विविध जाती धर्माचे सण साजरे केले जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रम देखील मोठ्या प्रमाणात राबवले जातात.
त्यामध्ये ईद-ए-मिलाद,दसरा,मकरसंक्रत, दिवाळी,श्री स्वामी समर्थ महाराज आगमन आणि शिवजयंती प्रत्येक सण जल्लोषात साजरे करतात.
त्यामध्ये दरवेळी सामाजिक कार्याचा वारसा जपत चंद्रकात घुले यांच्याकडून प्रत्येक कार्यात रॅलीमध्ये,मिठाई वाटप,सरबत, नाश्ता असे नियोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
यावर्षी देखील शिवजयंती निमित्त घुले गल्ली येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांच्या हस्ते पुष्पहार झाला मूर्तीचे पूजन करण्यात आले.यावेळी विनायक कलुबर्मे,शिवाजी नागने,लक्ष्मण हेंबाड़े सर,अशोक गुंगे,भारत दत्तू,पोपट पडवळे,अजित शिंदे,सचिन घुले,पांडुरंग वाळके,जयसिंग घुले, प्रवीण खवतोड़े,विनायक दत्तू,नितिन इंगले,शंकर गोवे,दत्ता खड़तरे,संतोष कांबले,दामोदर हेंबाड़े,संतोष राऊत,रवि खांडेकर,शब्बीर शेख,नितिन घुले,दत्ता घाडगे,सागर माळी,अशोक जावले,विजयराज कलुबर्मे अविनाश गुंगे,सोमनाथ बुरजे,सतिश दत्तू,बबलू सुतार आदि नी भेट दिली.
तसेच यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कडून शिवजयंती उत्सव अतिशय उत्तम रीतीने पार पडल्याबद्दल अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच शिवजयंती निमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांना जगदंब सामाजिक संस्थेच्या वतीने पायनापल शिरा व थंड पाण्याची सोय करण्यात आली होती.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव मूर्तीचे आगमन घुले गल्ली येथे झाल्यानंतर तेथील महिलांनी मिरवणूक मध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिवरायांच्या मूर्तीचे औक्षण या महिलांकडून करण्यात आले.
यावेळी विद्या गुंगे, सुजाता घुले,दिपाली घुले,कुंदनाताई घुले,स्मिता शिंदे,वैशाली घुले,संगीता घुले,पूजा घुले,स्वाती मुदगुल, तृप्ती घुले,मनीषा घुले आदीनी सहभाग घेतला.
तर शिरा वाटप करण्या करिता प्रशांत उर्फ गोटू गायकवाड़,अन्ना मुदगुल,तानाजी रायबान,महेश शिंदे सर,संतोष वाळके, विनोद शिंदे,दामाजी कदम, संतोष हेंबाड़े,राज घुले,अर्जुन गवळी, चैतन्य दत्तू, वैभव मोरे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी सुशिक्षित बेकार गणेश तरुण मंडळ,संत रोहिदास तरुण मंडळ,जय जवान तरुण मंडळ,मंगळवेढा टायगर परिवार आणि जगदंब परिवार ने परिश्रम घेतले.