मंगळवेढा:-
इतिहासाच्या पानापानांवर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व शौर्याची महती सांगताना युवाशाहीर अविष्कार देशिंगे यांचा शाहिराचा डफ मंगळवेढ्यात कडाडला ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडा व स्फूर्ती गीतातून आपली कला सादर करीत होते.
पोवाड्याचे उदघाटन डॉ.प्रणिताताई भालके यांच्या हस्ते तर सुनंदा आवताडे,श्रीमती भगिरथी नागणे,निलताई आटकळे,डॉ.प्रिती शिर्के,अरुणाताई दत्तू,अरुणाताई माळी,रतनताई पडवळे,सुप्रिया जगताप,विजया डोरले,अश्विनी नागणे,ऋतिका डोरले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सुरवातीस शिवजयंती मंडळ व माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्राच्या लोककलेतील मुकुट म्हणजे पोवाडा असून शाहीर आपल्या कलेतून तरुणांमध्ये स्वातंत्र्याची आग ज्वलंत ठेवत असतो,महापुरुषांचे विचार पोवाड्याच्या माध्यमातून तरुणांमध्ये रुजावेत,समाजसुधारणा व्हावी,सांस्कृतिक,सामाजिक ठेवा योग्य रित्या जपण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती मंडळाने आयोजित केलेल्या पोवाड्यातून शाहीर अविष्कार देशिंगे व शाहीर आकाश देशिंगे यांनी शाहिरी गण,ओम नमो श्री जगदंबे नमन तुज अंबे करून प्रारंभे तसेच शिवाजी महाराज जन्मोत्सव पोवाडा,अफजलखान वध, संभाजी महाराजांचे बलिदानाचा पोवाडा,जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबा गं कथा आणि कीर्तन,अंधार फार झाला एक दिवा पाहिजे,गुरुवर्य शाहिर डॉ देवानंद माळी रचित महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहिरी डफ कडाडला असे अनेक स्फूर्तीगीते,भेदीक व लोकगीते सादर करून उपस्थितांची मने जिकंली यावेळी सर्व माजी सैनिक,महिला भगिनी,शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.स्वाती दिवसे-कोंडूभैरी यांनी करून आभार मानले.