मंगळवेढा:-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या आदेशानुसार श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात कॉपी मुक्त अभियान जनजागृती सप्ताहाला सुरवात करण्यात आली.
दिनांक २० जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत सदर सप्ताहाअंतर्गत विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना विदयार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी या विषयावरती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
तर पुढील दिवसात कॉपी मुक्तीची शपथ,उत्तरपत्रिकेवरील सूचना व हॉल तिकीट वरील वाचन,शिक्षा सूचिचे वाचन,परीक्षेकाळात आरोग्याची व आहाराची काळजी कशी घ्यावी,परीक्षेत पेपर देत असताना कसा लिहावा व वेळेचे नियोजन कसे करावे,कॉपी मुक्तीचे घोषवाक्ये तयार करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
कॉपी मुक्त अभियान जनजागृती सप्ताहाचे प्रास्तविक उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी केले यावेळी प्रा.डॉ.नवनाथ जगताप,प्रा.शैलेश मंगळवेढेकर,प्रा.राजेंद्र नागणे,प्रा.महेश डोके,प्रा.धनाजी गवळी,प्रा.गणेश भुसे,प्रा.दादासाहेब देवकर,प्रा.निर्मला सावंत,प्रा.प्रियंका शिंदे,प्रा.कविता क्षीरसागर,प्रा.शारदा गाडेकर,प्रा.सारिका काटे,प्रा.अश्विनी राहणे यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.