मंगळवेढा:-
ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत दामाजी महाविद्यालयात २० डिसेंबर रोजी स्वछता अभियान राबवून कृतीतून गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचा परीसर स्वच्छ करुन विदयार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य राजेंद्र गायकवाड,कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.शैलेन्द्र मंगळवेढेकर वरिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.बी.गावकरे,डॉ.डी.एस.गायकवाड यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक,विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.