स्व.रतनचंद शहा यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ जुलै, २०२४

स्व.रतनचंद शहा यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम संपन्न.


मंगळवेढा:-

मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते रतनचंद शहा बँकेचे संस्थापक चेअरमन मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व.रतनचंद शहा यांच्या १८व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम यांच्या आयोजन केले गेले होते.


सकाळी ९.३०वा.श्री संत दामाजी महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते, यामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.


तसेच शहराच्या विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मूकबधिर शाळेमध्ये खाऊवाटप करण्यात आले. 


तसेच स्व.रतनचंद शहा बँके समोरील भव्य पटांगणामध्ये मोफत नेत्र शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले गेले होते.यामध्ये 105 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबिरासाठी न्याब नेत्र रुग्णालय मिरज यांचे सहकार्य लाभले. 


त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता प्रशांत देशमुख खोपोली यांचे जगणे सुंदर आहे या विषयाचे व्याख्यान संपन्न झाले. 


या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा,मा.आ. प्रशांत परिचारक,पांडुरंग सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंत देशमुख,विठ्ठल शुगर्सचे मा.चेअरमन भगीरथ भालके,कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढाचे सभापती सोमनाथ आवताडे,दामाजी शुगर्सचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा.चेअरमन तानाजी खरात,संचालक औदुंबर वाडदेकर,बसवराज पाटील गौरीशंकर बुरकुल,गोपाळ भगरे,मा.नगरसेवक अरुण किल्लेदार,मा.नगराध्यक्ष धनाजी खवतोडे,शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार,इन्नुस शेख,विजय बुरकुल,रतनचंद शहा बँकेचे संचालक मुजफ्फर काझी,विद्या विकास मंडळाचे सचिव किसन गवळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील तालुका उपाध्यक्ष संतोष रंदवे,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी,युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य बेदरे,युवक शहराध्यक्ष जमीर इनामदार,शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष येताळा भगत,शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले,मनसे नेते नारायण गोवे,लक्ष्मण नागणे,ओबीसी सेल अध्यक्ष सागर गुरव,ओबीसी सेल उपाध्यक्ष पंडित गवळी,उपाध्यक्ष वैभव ठेंगील,सरचिटणीस सचिन वडतीले,प्रसिद्धी प्रमुख अय्याज शेख,चिटणीस सुहास मुरडे,अनवर मुल्ला आदी.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


test banner