मंगळवेढा:-
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुढवी गावात 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हनुमान मंदिरासमोरील जागेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकल मराठा समाज मुढवी यांच्या वतीने केलेले आहे.
मुढवी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान सकल मराठा समाजा मुढवी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तसेच 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले.