मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक २५ जुलै रोजी संस्थेचे संस्थापक स्व.रतनचंद शिवलाल शहा यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपसली.
सुरवातीस शिबिराचे उदघाटन व स्व.रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन लक्ष्मण नागणे,राहुल शहा,बाबासाहेब पाटील,किसन गवळी,मुजफ्फर काझी,चंद्रशेखर कोंडूभैरी,नारायण गोवे,जोतिराम माने,संतोष रंदवे,जमीर इनामदार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असताना समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या हेतूने सरजुबाई बजाज रक्तपेढीच्या सौजन्याने संपन्न झालेल्या शिबिरातील ५५ रक्तदात्याचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले.
सदरचे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.दत्तात्रय गायकवाड,डॉ. राजेश गावकरे,प्रा.प्रशांत धनवे,नॅक समन्वयक डॉ.पी.एम. होनराव यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तसेच सौ.सरजूबाई बजाज रक्तपेढी पंढरपूरचे डॉ.आनंद खिस्ते,किरण धोंगडे यांनी परिश्रम घेतले.