मंगळवेढा:-
मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते,रतनचंद शहा सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन स्व.रतनचंद शिवलाल शहा यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज गुरुवार दि.२५ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले असल्याची माहिती रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी दिली.आज गुरुवार दि.२५ जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता दामाजी महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच सकाळी 9.30 वा. मंगळवेढा शहरांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून सकाळी 10.30 वा.मूकबधिर विद्यालयांमध्ये खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
तसेच सकाळी 11 ते 4 या वेळेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रतनचंद शहा बँकेसमोर पटांगणामध्ये न्याब नेत्र रुग्णालय यांच्या सौजन्याने संपन्न होणार आहे.
तसेच सायंकाळी 5.30 वा. रतनचंद शहा बँकेसमोरील पटांगणामध्ये स्व.रतनचंद शहा यांची प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असून सायंकाळी सहा वाजता जगणे सुंदर आहे या विषयावरती वक्ते प्रशांत देशमुख खोपोली यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे.