श्री संत दामाजी महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २४ जुलै, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा.


मंगळवेढा:-

श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या दिनांक २४ जुलै या तिसऱ्या दिवशी कनिष्ठ स्तरावरील विदयार्थ्यांच्या मनात तंदुरुस्तीचे महत्व जागे करत सांघिक व शिस्तीची भावना तयार होण्यासाठी क्रीडा दिन साजरा करण्यात आला.


सुरवातीस ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव व उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कब्बड्डी,बुद्धिबळ,लंगडी अशा देशी खेळांना प्रोत्साहन देऊन विदयार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्यात आली.


आज मुलांनी मोबाईल स्क्रीनवरती खेळण्यापेक्षा मैदानावरती खिलाडूवृत्तीतुन खेळ खेळून विद्यार्थ्यांनी नाव मोठे केले पाहिजे असे डॉ.जाधव यांनी सांगून शुभेच्छा दिल्या तर प्रा.गायकवाड म्हणाले मन आणि मनगट मजबूत असेल तर जीवनात यशस्वी होता येईल असे सांगितले.


सदर क्रिडादिन यशस्वी करण्यासाठी क्रिडा शिक्षक प्रा.विजय दत्तू,प्रा.गणेश जोरवर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले प्रास्तविक प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी केले तर प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले केले यावेळी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.




test banner