पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन.


प्रतिनिधी:-

आगामी विधानसभा डोळ्यासमोर असताना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून राहुल शहा यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती आले असता त्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.


या निवेदनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ शरद पवारांना मानणारा मतदारसंघ असून या मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून अनेक नेत्यांना आमदार होण्याची संधी मिळाली.


तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात व त्यांना 45000 चे मताधिक्य देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असण्याचे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले.


तसेच मंगळवेढा तालुक्यामध्ये राहुल शहा यांचे आजोबा कै.रतनचंद शहा यांनी सहकार,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामधून योगदान देत तालुक्याला एक नवीन गती दिली. तसेच त्यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष पद देखील भूषवले होते. 



पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ हा शरद पवार यांना मानणारा असून हा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.या मतदारसंघा मध्ये पवारांची मोठ्ठी ताकद असल्याने संतभूमी मंगळवेढा म्हणून ओळख असलेल्या मतदारसंघातून उमेदवार देऊन मंगळवेढाला न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.


या निवेदनावरती शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी,तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील, कार्याध्यक्ष माणिक गुंगे,सुरेश कट्टे, lपंडित गवळी,रामगोंडा सोमगोंडे,नागेश दगडू राऊत,सैफअली शेख,काशिनाथ पांडुरंग सावंजी,संतोष रंदवे,औदुंबर सोपान निमंगरे, लिंबाजी निमंगरे,राहुल चौगुले,नागेश बिराजदार, धनाजी चव्हाण,सौ.संगीता कट्टे,स्मिता अवघडे,मंदाकिनी सावंजी,सारिका सलगर,सदाशिव माळी,मुजफ्फर काझी,विकास मेटकरी,शंकरराव शिंदे, दत्तात्रय स्वामी,सलीम शेख,लव्हाजी लेंडवे आदी. पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांनी सह्या केल्या.



test banner