शेतकरी वजन काट्याचा प्रयोग मंगळवेढा तालुक्यात होणार सजग नागरी संघ कृती समितीचा पुढाकार ; शेतकऱ्यांना काटामारी पासून होणारा त्रास कमी करू : संजय कट्टे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ६ जून, २०२४

शेतकरी वजन काट्याचा प्रयोग मंगळवेढा तालुक्यात होणार सजग नागरी संघ कृती समितीचा पुढाकार ; शेतकऱ्यांना काटामारी पासून होणारा त्रास कमी करू : संजय कट्टे


मंगळवेढा:

उसाच्या वजनातील काटामारी वरील उत्तर म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काट्याचा प्रयोग आंदोलन अंकुश ने यशस्वी करून दाखवल्याने याची राज्यभर चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने या काट्याची माहिती करून घेण्यासाठी मंगळवेढ्याचे शिष्टमंडळ शेतकरी वजन काट्यावर भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी याची माहिती घेऊन अशाच प्रकारचा प्रयोग येत्या हंगामात काटा उभा करून करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे यांनी सांगितले. 


सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून महाराष्ट्रात सर्वात जास्त काटामारी केली जात आहे, ही काटामारी रोखायची झाल्यास शेतकऱ्यांचा त्रयस्थ असा काटा उभा राहिल्याशिवाय ही काटामारी बंद होणार नाही हे ओळखून मंगळवेढ्यातील २० हून अधिक शेतकरी आंदोलन अंकुश च्या शेतकरी वजन काट्याची माहिती घेण्यासाठी आले होते. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना काट्याविषयी माहिती दिली व काटा उभारणीसाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.


आंदोलन अंकुशचे शेतकऱ्यांप्रती सुरु असलेलं काम पाहून आलेले शेतकरी चांगलेच प्रभावित झाले. येत्या हंगामात आम्ही असाच काटा आमच्या भागात उभा करून दाखवतो असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.


यावेळी कृष्णा देशमुख,महेश जाधव,अमोल गावडे, एकनाथ माने यांच्यासह शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,मंगळवेढ्यातील सजग नागरी कृती समितीचे अध्यक्ष संजय कट्टे, अॅड. भारत पवार, दत्तात्रय खडतरे,सिद्धेश्वर हेंबाडे, प्रा.येताळा भगत सर, विजयसिहं गायकवाड,पत्रकार विक्रांत पंडित,अजय आदाटे,ज्ञानेश्वर भंडगे,सरपंच मल्लिकार्जुन भांजे, दिलीप धनवे, सुरेश पवार, प्रा.डी. एन. जाधव, श्रीशैल कुंभार, महासिद्ध काकानी हे या शिष्टमंडळात सहभागी होते.


test banner