श्री संत दामाजी महाविद्यालयात मुलींना मोफत एसटी पासचे वाटप. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १८ जून, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात मुलींना मोफत एसटी पासचे वाटप.


मंगळवेढा:-

श्री संत दामाजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते मुलींना मोफत एसटी पासचे वाटप करण्यात आले खरं तर दोनच दिवस महाविद्यालय सुरु झालेले असताना महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे अतिशय तत्परतेने मंगळवेढा आगाराने अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पासचे वितरण केले आहे.


सदर सुविधेमुळे आता मुलींना स्टॅंडवरती जाऊन तासनतास रांगेमध्ये उभे राहायची गरज भासणार नाही त्यामुळे मुलींचा वेळही वाचणार आहे दामाजी महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या मोठी असल्याने सदर योजनेमुळे अनेक मुलींना लाभ होणार आहे.


त्यामुळे विध्यार्थी व पालक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी महामंडळाचे अधिकारी परमेश्वर भालेकर,अशोक चव्हाण,उमेश ननवरे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्रा.धनाजी गवळी यांनी सर्वांचे आभार मानले.


test banner