मंगळवेढा -
निव्वळ राजकारण न करता समाजकारण करत समाजाच्या सर्व घटकांच्या व निसर्गाप्रती सुद्धा सेवेस कट्टीबद्ध राहावं हे व्रत स्विकारून पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उपक्रमा अंतर्गत वृक्ष लागवडीकरता उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रत्येकी एक केशर आंब्याचे रोप भेट देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील तापमान कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या वृक्षलागवड उपक्रमाची राजेंद्र माळी यांनी माहिती सांगितली यावेळी प्राचार्य सुधीर पवार म्हणाले आज पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. मानवी नात्याबरोबरच आज निसर्गाशी अतूट नाते निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यासाठी असे वृक्षलागवाडीचे नवोपक्रम निश्चितच उपयोगी ठरणार आहेत असे सांगून आमदार दत्तात्रय सावंत यांचे आभार मानले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.