मंगळवेढा शहरातील गटारींचा प्रश्न सुटणार तर कधी❓ - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २८ मे, २०२४

मंगळवेढा शहरातील गटारींचा प्रश्न सुटणार तर कधी❓


मंगळवेढा:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण मंगळवेढा शहरात अंडरग्राउंड गटार करण्यासाठी वारंवार निवेदन पत्र देऊन सुद्धा अजूनही त्याचं काम सुरू झालेलं नाही फक्त उडवा उडवी ची उत्तर दिली जात आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मंगळवेढा शहरातील गटारीचा आहे.


आज आम्ही लहानाचे मोठे झालो 35-40 वर्ष जर गटारीची समस्या जशाच तशीच असेल आणि वारंवार त्याच्यावरती नवनवीन गटारी बनवल्या जातात त्याच्यातून पैसे मिळवले जातात पण गटारीची अवस्था जशी आहे तशीच असते तेच कामगार रोज गटारी येऊन काढतात तरीसुद्धा गटारीची अवस्था तशीच असते कारण त्याचं उघड्यावरच्या गटारी ह्या अंडरग्राउंडच असल्या पाहिजे जेणेकरून रस्त्यावरील कचरा त्या गटारीत पडणार नाही व आणि गटारी तुंबनार नाही. 


नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचाही ताण कमी होईल,कारण आठवड्याभरात जेवढ्या गल्लीच्या गटारी काढून होत आहेत म्हणजे प्रत्येक आठवड्याला कुठल्या ना कुठल्या गल्लीत गटारीचा प्रॉब्लेम असतोच आणि ते गटार कामगार जे आहेत ते गटर काढण्यासाठी जात आहेत गटर काढून येतात परंतु तेही वर वरचा घाण काढतात परंतु गटारीतील गाळ काय निघत नाही कारण पाणी गटारी तुंबलेले असते गटारी कधीच अशा शहरातल्या कुठे खळखळ वाहत आहेत अशा दिसत नाहीच त्याचं कारण म्हणजे ऊघड्यावरच्या गटारी किती दिवस पाहायचं याकरिता म.न.से. कडून अंडरग्राउंड गटारी करण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा 34 कोटी मंजूर होऊन सुद्धा जर त्याचं नियोजन होत नसेल तर काय उपयोग आहे.


शहरात बाकी अजून कचऱ्याचे नियोजन नाही गटारीचं नियोजन नाही मग सार्वजनिक मुतारी चे सार्वजनिक संडास महिला पुरुष त्याच्या आजूबाजूला पडलेला कचरा घाण याचे ही नगरपालिकेचे लक्ष नाही मग जनतेला प्रश्न पडतो की बाबा नगरपालिकेचे कर्मचारी करताय तरी काय हे जर असं सुरू राहिलं तर शहराचा विकास होणे शक्य नाही यावरती कायमचा उपाय म्हणजे अंडरग्राउंड गटार करणे व बाकी सार्वजनिक ठिकाणचे नियोजन करणे अरे जग चंद्रावर जायच्या गोष्टी करतय आपण अजून आहे तिथेच आहे.


म्हणून म.न.से. शहराध्यक्ष राजवीर हजारे नगरपरिषदेला तुमच्या माध्यमातून विनंती करतोय की या गटारी सार्वजनिक मुतारी सार्वजनिक संडास स्वच्छतालय या सर्व गोष्टी ह्या अत्यंत गरजेच्या आहेत त्या जरी नीट नसतील तर मंगळवेढा शहरातील नगरपालिकेचा काहीही उपयोग नाही असे म.न.से.कडून सातत्याने सांगत येतोय आणि आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना व नगरपालिकेला याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा आम्ही पत्र देतोय निवेदन देतोय सगळ्या गोष्टी करतोय परंतु यावर नुसते दिवस पुढे ढकलले जातायत यावर कायमचा काहीतरी उपाय करा नसेल तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व नगरपालिकेचे जिथे जिथे काम चुकारपणा असेल जिथे घाण असेल तेथील सर्व ठिकाणी चे फोटो काढून शहरात सर्वत्र ठिकाणी बॅनर लावण्यात येतील व म.न.से. स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे ही सांगण्यात आले.


test banner