संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवेढ्यात विविध कार्यक्रम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २३ मे, २०२४

संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवेढ्यात विविध कार्यक्रम.


मंगळवेढा:-

संत शिरोमणी संत चोखोबाराय यांच्या ६८६ व्या पुण्यतिथी निमित्त संत नगरी मंगळवेढा येथे दि २६ मे ते २८ मे २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी दिली. 


२६ मे रोजी सकाळी ९ वाजता दामाजी मंदिरापासून चोखामेळा समाधी मंदिरापर्यंत दिंडी प्रदक्षिणा सकाळी १० वाजता ह.भ.प. माधव महाराज नामदास यांच्या हस्ते विणापूजन करण्यात येणार आहे.


दिवसभर सामुहिक भजन होणार असुन सायं ७ वाजता ह.भ.प. वैशाली महाराज धायगुडे,बारामती यांचे किर्तन होणार आहे.दिनांक २७ मे रोजी दिवसभर सामुहिक संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले असून सायं ७ वा झी टॅाकिज फेम ह.भ.प. संस्कार महाराज खंडागळे यांचे किर्तन होणार आहे दिनांक २८ मे रोजी संत चोखोबाराय यांच्या स्मृतीदिनानिमित्त सकाळी ९ वाजता समाधीस्थळी महाभिषेक सोहळा होणार असून सकाळी ११ वाजता हभप निवृत्ती माधव नामदास महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असुन समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.


दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप करून पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे तरी सर्व वैष्णवांनी व नागरीकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत चोखामेळा स्मृतीदिन सोहळा समिती व वारी परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



test banner