जवळपास निश्चित! माढा लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी कडून यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता या तारखेला पक्ष प्रवेश होण्याची शक्यता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

जवळपास निश्चित! माढा लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी कडून यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता या तारखेला पक्ष प्रवेश होण्याची शक्यता.


मंगळवेढा:-

माढा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने रणजीत निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केला आहे.त्यांनतर महाविकास आघाडी कडून अद्याप ही उमेदवाराची घोषणा झाली नाही.


आता माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


धैर्यशील मोहिते पाटील हे नवीन मराठी वर्षात म्हणजे 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या सणाचे औचित्य साधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मोहिते पाटील हे ९ तारखेला पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनतर १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात आहे.


त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीवर लढण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.आत्तापर्यंत महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.


त्यामध्ये दिंडोरी येथून भास्करराव भगरे,वर्धा मधून अमर काळे,बारामती मधून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे तर अहमदनगर मध्ये निलेश लंके यांना संधी देण्यात आलेले आहे.


तसेच माढा लोकसभा मतदारसंघासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड ही इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.सर्वांचे माढा लोकसभा मतदार संघाकडे लक्ष लागून राहिले आहे.


test banner