प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंंडवे चिंचाळे ता. मंगळवेढा येथील शिक्षक संभाजी बजरंग तानगावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सोलापूर जिल्हा निवड समिती सदस्य भीमाशंकर तोडकरी यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात आले. सदर निवडीबद्दल आंधळगांव केंद्राच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी MSP चे सोलापूर जिल्हा समन्वयक निवास माळी, केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
संभाजी तानगावडे यांनी सन २०२२-२३ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून १० विद्यार्थी पात्र झाले असून एका विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सदर पुरस्कार वितरण सोहळा १४ मे २०२४ रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातून संभाजी तानगावडे यांना जाहीर झाल्याबद्दल मंगळवेढा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नपा.मनपा सरचिटणीस संजय चेळेकर, मंगळवेढा तालुका शिक्षक संघाचे कार्यकारिणी मंडळ व महिला आघाडी, श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ, सरपंच व सदस्य ग्रामपंचायत लेंडवे चिंचाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ तसेच तालुक्यातील शिक्षक मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे