श्री संत दामाजी महाविद्यालयात पीएम विश्वकर्मा सन्मान योजना शिबिर संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २ मार्च, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात पीएम विश्वकर्मा सन्मान योजना शिबिर संपन्न.


मंगळवेढा:-

श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये पी एम विश्वकर्मा सन्मान योजना शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत महिलांना मोफत टेलरिंग कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले सदर शिबिरात मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातील 22 महिलांनी सहभाग नोंदवला.


या शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रोफेसर डॉ. एन बी पवार यांनी या शिबिराच्या माध्यमातून प्राप्त केलेल्या कौशल्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून आपल्या कुटुंबाचा विकास कसा साधता येईल याविषयी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.


या कार्यक्रम प्रसंगी श्री बसवराज म्हेत्रे,खाजू शेख (R.K.टेलर), सोलापुरातील रविकिरण स्किल सेंटर मधील केदार हनमगोंडा,नवनीत चव्हाण,प्रमोद वळसांगे,सचिन लवंगी उपस्थित होते. 


शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री संत दामाजी महाविद्यालयाचे कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ.जावेद तांबोळी यांनी परिश्रम घेतले.


test banner