मंगळवेढा:-
प्रत्येक कुटुंबाच्या आधाराचा खरा स्तंभ स्री असते असे मत सेवानिवृत्त प्रा.वनमालाताई भगरे यांनी व्यक्त केले ते प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज येड्राव-खवे येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्षा साधनाताई जाधव उपस्थित होत्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले व स्व अनुराधा ढोबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी भगरे म्हणाल्या की,स्री ही घरातील देवता असते स्वतःचे दुःख विसरून इतरांच्या आनंदासाठी ती राब राबत असते आज प्रत्येक स्त्रियांनी स्वतःचे अस्तित्व टिकवणे,समाजात आपले स्थान निर्माण करणे,जीवन समृद्ध करणे,इतरांशी स्पर्धा न करता स्वतःचा विकास साधणे यासाठी हा जागतिक महिला दिन साजरा केला पाहिजे.
प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची धमक आहे हे स्त्रीने कर्तृत्ववाने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. आपण जीवन जगत असताना आपले जीवन समृद्ध करत असताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास झाला पाहिजे,आपल्यात आत्मविश्वास आला पाहिजे हे सांगत असताना त्यांनी नारी शक्तीची महती सांगून स्त्री सामर्थ्याचा गुणगौरव केला.
यावेळी शिक्षिका प्रतिनिधी म्हणून राजश्री घुले यांनी तर प्रिती दुधाळ,शामल बाबर,दिव्या पवार,सानिका पवार या विद्यार्थ्यांनी मगोगत व्यक्त केले.यावेळी महिलांसाठी फनीगेम्सचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य विश्वंभर काळे,मुख्यध्यापक सुनिल पवार,सुनिल डोके,सिद्धेश्वर रोंगे,पोलीस पाटील दत्तात्रय पाटील,शोभाताई गुंड,आक्कताई मदने,निर्मलाताई पडवळे,प्रा.कस्तुरा माने,प्रा.विजया गणपाटील,संगिता सावंत,जयश्री पाटील,विजया पडणूरे, सुजाता बड्डे,अनिता विभुते यांचेसह विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
पुजा पाटील,प्राजक्ता वाघमारे,स्नेहल गायकवाड,प्राजक्ता शेंबडे या विद्यार्थिंनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती निकम यांनी तर सुत्रसंचालन प्रा रूपाली कलुबर्मे यांनी केले तर उन्नती पवार यांनी आभार मानले.