मराठी भाषा गौरव दिना निमित्त मनसे कडून सर्व महाविद्यालय,शासकीय कार्यालय येथे राज्यगीत भेट. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १ मार्च, २०२४

मराठी भाषा गौरव दिना निमित्त मनसे कडून सर्व महाविद्यालय,शासकीय कार्यालय येथे राज्यगीत भेट.


मंगळवेढा:-

मराठी भाषा गौरव दिना निमित्त सर्व शासकीय कार्यालयात आणि सर्व कॉलेज व शाळे मध्ये आणि पोलिस स्टेशन मध्ये मनसे कडून राज्यगीत भेट देण्यात येणार.


आजच्या दिवशी श्री संत दामाजी कॉलेज आणि मंगळवेढा पोलिस स्टेशन या दोन ठिकाणी राज्यगीत भेट देण्यात आले. आपली मराठी भाषा ही आपली संस्कृती ही आपणच जतन केली पाहिजे व सर्व शाळा हायस्कूल कॉलेजेस यामध्ये हे राज्य गीत अनिवार्य झालं पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी असून आजकाल आपली मराठी भाषेला दूजाभाव मिळत चाललेला आहे.


त्यामुळे आपणच आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व सर्वांना मराठीत बोला असा आग्रह पहिल्यांदा आपलाच असला पाहिजे.त्यामुळे समोरचा जरी हिंदीत बोलत असेल तर आपण त्याला मराठीत बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे त्यामुळेच आपण मराठी भाषा दिन साजरा करतो म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांचे कडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रात हे राज्य की पोचवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहेत.


आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून श्री संत दामाजी कॉलेज व मंगळवेढा पोलीस स्टेशन या दोन विभागात हे महाराष्ट्राचे राज्य गीत देण्यात आलं यावेळी उपस्थित महाराष्ट्र सर्व महाराष्ट्र सैनिक मंगळवेढा तालुका व शहर.


test banner