प्रतिनिधी:-
शिवसेना पक्ष फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्येही मोठ्ठी फूट पडली अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला.
त्यांनतर राष्ट्रवादीतील फुटी नंतर पक्ष्यावरती व चिन्हावराती शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांनी दावा केला होता.
त्यानंतर ही दोन्ही गटाची लढाई ही निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर काल निवडणूक आयोगाने अंतिम निकाल दिला.
त्या निकाला मध्ये निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला.अजित पवार यांचा गट हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले व पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले.
हा निर्णय हा शरद पवार गटाला मोठ्ठा धक्का देणारा निर्णय ठरला आहे.
या निर्णयाचे अजित पवार गटाकडून स्वागत करण्यात आले आहे व राज्यभर मोठा जल्लोष करण्यात आला.
आगामी राज्यसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाला निवडणुकी साठी वेगळे नाव आणि चिन्हावरती निवडणूक लढवावी लागेल.
शिवसेना फुटी नंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मधून 40 आमदारांचा एक गट बाहेर पडला असता अजित पवार यांच्या सह ९ जणांनी महायुती मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यांनतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर पक्ष व चिन्हासाठी धाव घेतली.
अजित पवार यांचा गट हीच खरी राष्ट्रवादी हे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
त्यांनतर प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे म्हणाले की आम्ही अतिशय आनंदी आहोत.निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्यानयाचे आम्ही स्वागत करतो.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरवलेली ध्येय धोरणे अजित पवार यांच्या नेतृत्वात योग्य पणे बजावेल आणि राज्यातील जनता आमच्या पाठीशी असेल असा विश्वास मी व्यक्त करतो.
निकालानंतर अजित पवार पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना म्हणाले की,निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणे स्वीकारत आहे.