मंगळवेढा:-
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून ४८ व्या वर्षीचे आयोजित ११ ते १८ फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
त्यामधील आज मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा मारुती पटांगण येथे पुष्प दुसरे गुंफण्यासाठी येत आहेत सत्यपाल महाराज यांचे शिष्य डॉ.रामपाल महाराज धारकर कुरखेडा जि.अमरावती रामपाल की रहस्यावानी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमा वेळी अनेक विचार रुजवले जाणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी महिला भगिनी,शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केले आहे.