मंगळवेढा:-
सकल मराठा समाजाच्या वतीने आ.समाधान आवताडे यांच्या ऑफिस समोर ठीय्या आंदोलन करून मराठा आरक्षणा संदर्भात निवेदन देण्यात आले.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून आमरण अन्नत्याग व जलत्याग उपोषण करत असून महाराष्ट्रातील सर्व आमदार,खासदार,मंत्री यांच्या घर व ऑफिस समोर ठिय्या आंदोलन करून सर्वांना निवेदन देण्यात आले.
त्याचाच भाग म्हणून आज मंगळवेढा मध्ये ठीय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले येत्या वीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलवले असून या अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी आवाज उठवावा यासाठी त्यांना सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे सर्व सदस्य उपस्थित होते.