मंगळवेढा:-
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाची बैठक मंगळवेढा येथे पार पडली.
यामध्ये शिंदे सरकारने सगेसोयरेचा मसुदा मुंबईमध्ये मनोज जरांगे यांना देऊनही विशेष अधिवेशनामध्ये हा विषय न घेता ज्या आरक्षणाची मागणी नाही.
अशा प्रकारचे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे त्याचा निषेध सर्वानुमते करण्यात आला याशिवाय जरांगे पाटील यांची होणारी बदनामी काही लोकांकडून जाणीवपूर्वक केली जात आहे त्याचाही निषेध करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुक्यातून सकल मराठा समाज त्यामध्ये सहभागी होण्याविषयी सर्वांनी मते निर्णय घेण्यात आला व लवकरच पुढील दिशा ठरवली जाईल असे सकल मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात आले.