मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ संचालित,श्री संत दामाजी महाविद्यालय केंद्र क्रमांक ४९२ या परीक्षा केंद्रावरती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या बारावी बोर्ड परीक्षा शांततेत व सुरळीत सुरू आहे.
पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींचे व पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रावरती बैठे पथक व पोलीस पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली असून प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रसंचालक प्रा राजेंद्र गायकवाड,उपकेंद्र संचालक प्रा विलास गुरव हे काम पाहत आहेत.
प्रत्येक पेपरवेळीस स्पिकरवरून विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना व परीक्षार्थींचे मनोबल वाढवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे आवाहनही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
केंद्रावर बैठक व्यवस्था, स्वच्छता,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,बंदोबस्त अशी चोख व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे शांततेत व कॅापीमुक्त वातावरणात सुरू असलेल्या परीक्षेवेळी तहसीलदार मदन जाधव यांनी भेटीदरम्यान समाधान व्यक्त केले आहे.