सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.



मंगळवेढा:-

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून शिवजयंती निमित्त ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आसल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी दिली.


त्यामध्ये रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी भगव्या पदयात्रेचे आयोजन केले गेले आहे.मा.अध्यक्ष रामचंद्र वाकडे यांच्या यांच्या हस्ते भगव्या पद यात्रेचे तर मा.अध्यक्ष भीमराव मोरे मोरे यांच्या हस्ते शिवविचार व्यासपीठाचे पूजन करण्यात येणार आहे.


सायंकाळी ६.३० वा.आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते व धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार असून त्यांनतर सायंकाळी ७.३० वाजता संगीत विशारद प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी सामूहिक तबला वादनातून शिववंदना सादर करण्यात येणार आहे.


सोमवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील आघना मोडक यांचे जगण्याचे गाणे होताना या विषयावरील व्याख्यान संपन्न होणार आहे.


मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी तुरखेड जि.आमरावती येथील डॉ.रामपाल महाराज धारकर यांचा रामपाल की रहस्यवाणी या सप्तखांजिरी वादन कार्यक्रमाचे उद्घाटक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते व जकराया शुगर्स चे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

 

बुधवार दि.१४ रोजी सायंकाळी ७.३० वा.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा. व्हा.चेअरमन बबनराव अवताडे यांच्या हस्ते व भैरवनाथ शुगर्स चे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कामखेडा जि.लातूर येथील ह.भ. प.कृष्णा महाराज जोगदंड यांचा तुमची भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


गुरुवार दि.१५ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.उदयसिंह दत्तू यांच्या हस्ते व नितीन चौंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सायंकाळी ७.३० वा. बीड येथील राहुल गिरी यांचे शिवचरित्र व अजाची तरुणाई या विषयावरील व्याख्यान उद्घाटक मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते व दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.


शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.मधुकर महाराज सायाळकर पालम जि.परभणी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमाचे उद्घाटक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन भगीरथ भालके हे असतील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दामाजी शुगर्स चे व्हा.चेअरमन तानाजी खरात हे असतील.


शनिवार दि.१७ रोजी सायंकाळी ७.३० वा.लातूर येथील शाहीर निशिगंधा संतोष साळुंखे यांचा आम्ही जिजाऊंच्या लेकी या महिला शाहिरी पथकाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन स्व.भारत नाना भालके फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.प्रणिता  भालके यांच्या हस्ते व पांडुरंग परिवाराच्या सीमा परिचारक यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे.


रविवार दि.१८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे यांच्या हस्ते उद्घाटन व उद्योजक वैभव नागणे यांच्या अध्यक्षतेखाली लोककला अकादमी मुंबईचे प्राध्यापक योगेश चिकटगावकर यांच्या शिवशाहीची ललकार या लोककला व लोकनृत्य यांचा मराठमोळा कार्यक्रम होणार आहे.


सोमवार दि.१९ रोजी सकाळी १० वाजता इंग्लिश स्कूलच्या उपप्राचार्य प्रा.तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची भगवा फेटा रॅली काढण्यात येणार आहे आणि त्यांनतर दुपारी ३.०० वाजता मंगळवेढा शहरातून शिवमूर्तीची भव्य मिरवणूक काढून उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.


test banner