सोलापूर जिल्हा मध्यामिक उच्च-माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था यांच्या कडून विविध पुरस्काराचे आयोजन कुणाला कुणाला मिळाले पुरस्कार व कोण कोण ठरलं आदर्श शिक्षक,मुख्याध्यापक? - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

सोलापूर जिल्हा मध्यामिक उच्च-माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था यांच्या कडून विविध पुरस्काराचे आयोजन कुणाला कुणाला मिळाले पुरस्कार व कोण कोण ठरलं आदर्श शिक्षक,मुख्याध्यापक?

       




                मंगळवेढा:-सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे,सोलापूर यांच्या मार्फत चालू वर्षापासून जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संचालक राजेंद्र माळी सर यांनी दिली.

               यामध्ये विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यामध्ये स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार,आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार,आदर्श शिक्षक,आदर्श क्रीडा  शिक्षक व आदर्श शिक्षकतर सेवक अश्या प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

  यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील जिल्हास्तरीय पुरस्कार.

              १)आदर्श,स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार:- श्री महालिंगराया हायस्कूल, हुलजंती.

            २)आदर्श मुख्याध्यापक:- मा.श्री.संजय दामोदर फुगारे सर.(शरदचंद्र कृषी विद्यालय,मारापुर)

            ३) आदर्श शिक्षक:-मा.श्री. विठोबा गेनबा आलदर (विद्यामंदिर हायस्कूल,सलगर बु.)

            ४) आदर्श क्रीडा शिक्षक:-मा श्री तुकाराम सदाशिव भोसले सर (विलासराव देशमुख विद्यालय,दामाजी कारखाना साईट मंगळवेढा)

             ५) आदर्श शिक्षकेत्तर सेवक:-मा श्री सुभाष शामराव सातपुते (माध्यमिक आश्रम शाळा येड्राव.)

             सदर कार्यक्रमात पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे मा.आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते व  चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालकांच्या उपस्थितीत रविवार दि. १४/०१/२०२४ रोजी दुपारी 1 वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट,केगाव,सोलापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगण्यात आले.





test banner