श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारंभ. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारंभ.

           


                    मंगळवेढा:श्री संत दामाजी महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे फटेवाडी ता.मंगळवेढा येथे गेली सात दिवस सुरू असलेला राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा दिनांक २८ जानेवारी रोजी सांगता समारंभ पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

                     त्यानंतर मौजे फटेवाडीचे विद्यमान सरपंच सिमाताई काळुंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभ वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभयसिंह मोहिते उपजिल्हाधिकारी,अहमदनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याबाबत आपले अनुभव कथन केले अभ्यासामध्ये सातत्य असावे,वाचनाची आवड असावी,परिश्रम करण्याची तयारी असावी,नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्म करत राहावे असे केल्याने यश आपल्याकडे धावत येते. 

                    आपणाला यशाच्या पाठीमागे धावण्याची गरज भासत नाही. याशिवाय मिळेल त्या मार्गाने जीवनाचे लक्ष साधण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माननीय अभयसिंह मोहिते यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ एन.बी. पवार सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास फटेवाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय फटे साहेब, विद्यमान उपसरपंच दिगंबर शिंदे साहेब तसेच युवक नेते फटेवाडी नागनाथ इंगोले साहेब यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एन.बी. पवार सर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास फटेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  

                    माननीय रावसाहेब फटे, विष्णू नारायण फटे, माजी सरपंच राजेंद्र फटे, माजी सरपंच, सुरेश वाडदेकर, शिवाजी अवताडे गुरुजी, मारुती लेंडवे साहेब, सुनील फटे, पोलीस पाटील फटेवाडी. चंद्रकांत पडवळे, दत्तात्रय थोरवत, दगडू फाटे साहेब, कार्यालयीन अधीक्षक दामाजी शुगर,ॲड. किरण पडवळे मंगळवेढा, सिद्धनाथ फटे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष संभाजी चव्हाण, प्रकाश काळुंगे इ. मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एन.बी. पवार सर यांनी भूषवले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ एन.आर.जगताप, डॉ डी.एस. गायकवाड व डॉ आर.बी. गावकरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. शैलेंद्र मंगळवेढेकर सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार डॉ. डी.एस. गायकवाड यांनी केले. 

                     सदर सांगता समारंभात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून आनंदा वरकुटे, बीए भाग- एक व उत्कृष्ट स्वयंसेविका दीक्षा ढावरे बीए भाग - एक यांची निवड करण्यात आली. कनिष्ठ विभागातून उत्कृष्ट स्वयंसेवक चंदन फटे ( ११ वी वाणिज्य ) व उत्कृष्ट स्वयंसेविका वैष्णवी बांदल ( ११ वी वाणिज्य ) यांना उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

                    सदर कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ कार्यक्रम अधिकारी यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एन.बी. पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.


test banner