पंढरपूरमध्ये कृषी विपनन संघटनांचे रक्तदान शिबीर संपन्न ..! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

पंढरपूरमध्ये कृषी विपनन संघटनांचे रक्तदान शिबीर संपन्न ..!

   


                       प्रतिनिधी:-पंढरपूर येथे आज प्रजासत्ताकदिनी एएमडब्ल्यूए,सिड्स पेस्टीसाईड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.


                     यावेळी शेती व शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी रक्तदान चळवळीला ७५ व्या अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हजेरी लावली.

                     सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकवून भारतीय संविधान प्रस्तावनाचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि संविधान समजावून सांगण्यात आले. 

                    ए.एम.डब्ल्यू.ए संघटनेचे अध्यक्ष अविनाश पवार, उपाध्यक्ष अमोल पाटील, खजिनदार बालाजी थोरात, चंद्रकात जाधवर, सचिन पवार, मोहन काळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांना रक्तदानाचे महत्व सांगितले.

                   सोलापूर जिल्ह्यातील या विविध प्रकारच्या संघटनेच्या सदस्यांनी उत्साहात रक्तदान केले.आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत.त्यामुळे प्रत्येकांनी रक्तदान केले पाहिजे.हा संदेश आगोदरच दिल्यामुळे आज रक्तदानासाठी शेती विपणन संघटनांच्या सभासदांनी मोठी गर्दी केली होती.

                  सकाळी अल्पप्रतिसाद मिळाला असला दुपारनंतर रक्तदानासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या हुतात्मा स्मारकामध्ये गर्दी झाली होती.यावेळी शेखर धनवडे,पृथ्वीराज देशमुख,विकास ढगे,अमोल पाटील , अमोल येलमार, चंद्रकांत जाधवर , कुलदीप मोरे, सचिन पवार, हनुमंत बंगाळे, फिरोज मुलानी, धनाजी घाडगे, ज्ञानदेव चोरमले, प्रकाश फुलारी, सोलापूर महानगरपालीकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.योगेश पल्लोलु उपस्थित होते. 

                  या रक्तदान शिबीरास सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी विविध कृषी विपनन कंपन्यांचे मालक,अधिकारी,डिलर व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान पंढरपूर नगर परिषदेच्या हुतात्मा स्मारक वाचनालयाला या संघटनांच्या वतीने १०० पुस्तकांचा संच भेट दिला आणि पंढरपूर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व डॉ. ऋषिकेश रसाळ यांनी सुद्धा वाचनीय पुस्तकांचा संच दिला,सचिव अजय आदाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार विकी झेंड यांनी मानले.


test banner