सोलापूर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या.कुणाला कुठले पोलिस स्टेशन मिळाले. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

सोलापूर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या.कुणाला कुठले पोलिस स्टेशन मिळाले.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

 पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या आदेशाने १३ पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत.

 त्यामध्ये कुर्डूवाडी चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा,अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा,तर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलिस ठाणे येथे तर पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा या ठिकाणी करण्यात आली आहे.


मानव संसाधन व कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, जिल्हा विशेष सेवा शाखेचे पोलिस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व पंढरपूर मंदिर सुरक्षेचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लीवार यांची बदली कुर्डूवाडी पोलीस ठाणे या ठिकाणी झाले आहे 

बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांची बदली नियंत्रण कक्ष येथे तर माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्ककोट उत्तर पोलिस ठाणे,माढा पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची बदली सांगोला पोलिस ठाणे,आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलिस ठाणे.test banner