श्री संत दामाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त विचारांचा जागर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त विचारांचा जागर.



                मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर घालण्यात आला सुरवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रोफेसर डॉ एन बी पवार यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

                 याप्रसंगी बोलताना प्रा विनायक कलुबर्मे म्हणाले की,संत गाडगेबाबांनी बुरसटलेल्या पारंपारिक प्रथेला छेद देण्याचे महत्त्वाचे काम केले तसेच अज्ञान,अंधश्रद्धा याच्यावरती कीर्तनाच्या माध्यमातून प्रहार करून वैज्ञानिक दृष्टीकोन दाखवत स्वच्छतेचे महत्त्व स्वतःच्या कृतीतून पटवून दिले त्यांच्या कार्याचीही महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली व त्यातूनच पुढे राष्ट्रसंत ग्रामस्वच्छता अभियान राबवले जात आहे.

                यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एन बी पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संत गाडगेबाबांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे व त्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी याच हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.संत गाडगेबाबांनी सांगितलेले विचार व कार्य समाजाच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोलाचे असे आहे. गाडगेबाबांनी सांगितले होते की, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, अंधश्रद्धा बाळगू नका,प्राण्यांची हत्या करू नका, वायफळ खर्च करू नका, स्वच्छतेचे महत्व लक्षात घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा,मुलांना शाळेत पाठवा त्याचबरोबर त्यांनी सांगितलेली दशसूत्री सर्वांनी अंगीकारणे काळाची गरज आहे.

                   गाडगेबाबा हे सर्व सांगत असताना फक्त ते सांगूनच राहिले नाही तर,त्यांनी तशी कृतीही आपल्या जीवनामध्ये केली होती गाडगेबाबांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन ग्राम विकास मंत्री असताना आर आर पाटलांनी ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण केली व ती गावागावा पर्यंत पोहोचवली असे सांगून त्यांनी अभिवादन केले पुण्यदिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सदर कार्यक्रमावेळी पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ राजकुमार पवार यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांनी मानले.



test banner